Dada Bhus, Suhas Kande
Dada Bhus, Suhas Kande sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिंदे गटात नाराजीचा 'बॉम्ब'; आमदार कांदेंचे पालकमंत्री भुसेंवर गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Nashik politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून ४० आमदारांसह भाजप सोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र, शिंदे गटात सर्व काही अलबेल नाही. आमदारांमधील नाराजी उघडपणे समोर येत आहे. यामध्ये नाशिकमधील नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील पदाधिकारी निवडताना पालकमंत्र्यांनी दादा भुसे ( Dada Bhuse ) यांनी आपल्याला डावलले. आम्हाला विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्याचा आरोप कांदे यांनी केला.

पदाधिकाऱ्यांची निवड पूर्णपणे चुकीची असल्याचेही कांदे म्हणाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही तयारी केली जात नाही, हे दुर्दैव आहे, असेही कांदे म्हणाले आहेत. चुकीच्या पदाधिकाऱ्यांची निवड केल्यामुळे शिंदे गटाला फटका बसू शकतो, असा दावाही त्यांनी केला.

आता नाशिक जिल्ह्यात सुहास कांदे यांच्या पदाधिकारी निवडीच्या नाराजीमुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे. एकनाथ शिंदे यांचा येत्या मंगळवारी नाशिक दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याआधीच शिंदे गटातील आमदारांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, मरेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार असल्याचे कांदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात आणि प्रमुख बैठकांमध्ये न दिसल्याने कांदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असताना कांदे हे मुख्यमंत्र्यांसोबत दिसले नव्हते. या प्रश्नावर विचारले, असता ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे नाशिकला आले, त्यावेळी मी माझ्या मतदारसंघात होतो. याची कल्पना शिंदे यांना दिली होती. शिंदे गटाचे नाशिकमध्ये कार्यालय कुठल्या ठिकाणी आहे, त्याचे उद्घाटन कधी झाले याची मला कल्पना नाही, असे कांदे यांनी सांगितल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शिंदे गटामध्ये अनेक जण येण्यासाठी इच्छुक आहे. मात्र, जिल्ह्यात ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहे, त्यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे कांदे यांनी सांगितले. सध्याच्या पदाधिकाऱ्यांमुळे शिंदे गटात लोक यायला तयार नसल्याचे कांदे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून कांदे नाराज असल्याच्या चर्चांवर आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

महत्त्वाच्या बैठकींना बोलावले जात नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. बैठकांना मला आमंत्रण देण्यात येत नाही, असेही त्यांनी सांगिते. तसेच त्यामुळे मी हजर राहत नाही. पालकमंत्री भुसे यांच्या स्थानिक बैठकांना मला कधीच आमंत्रण देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. आमदार खांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्यामुळे आता नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT