PI Nilesh Mainkar
PI Nilesh Mainkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Suhas Kande News : आमदार सुहास कांदे यांच्याकडे मागितली ५ लाखांची खंडणी?

Sampat Devgire

Suhas Kande extortion case : आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याबाबत पाच लाखांची खंडणी मागीतल्याची तक्रार आमदार सुहास कांदे यांनी गंगापुर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत न्यायलयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षकाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. (Extortion case file by MLA Suhas Kande against Police inspector Mainkar)

पोलिस (Police) निरीक्षक माईनकर यांनी आपल्याकडेस पाच लाख रुपये खंडणी मागितल्याची तक्रार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी नाशिक पोलिसांकडे केली आहे. बनावट महिलेद्वारे कोटयावधीचा भुखंड खरेदीच्या प्रकरणाशी संबंधीत गुन्ह्याच्या तपासाशी हे प्रकरण निगडीत आहे.

या संदर्भात श्रीमती शिला दामोदेर सावंत यांचा प्लॉट बनावट महिला उभी करून विक्री करण्यात आला होता. त्याबाबत २०१६ मध्ये पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यात मनमाड येथील अतुल भंडारी व अन्य महिलेविरोधात गुन्हा दाखल होता. त्यात आमदार कांदे यांचे मेव्हणे फऱहान खान यांना देखील आरोपी केले होते. यामध्ये राजकीय व्यक्तीचा हात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

या गुन्ह्यामध्ये आमदार कांदे यांना आरोपी करण्याच्या दृष्टीने पोलिस तपास अधिकाऱ्यांनी वातावरण निर्माण केले होते, असा आरोप आहे. याविषयी पोलिसांनी श्री. कांदे यांना समज देऊन तपासासाठी हजर राहण्याचे समजपत्र दिले होते. श्री. कांदे तेव्हा नाशिक जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष होते. त्यामुळे या गुन्ह्यात गोवले जाऊन अटक होईल अशी भिती त्यांना होती.

याअनुषंगाने श्री. कांदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तोंडी तक्रार केली होती. त्यानुसार याबाबत गुप्तता राखण्याची सुचना त्यांना देण्यात आली होती. याबाबत हॉटेल एक्सप्रेस इन येथे बैटक झाली. दुसरी बैठक तिबेटियन मार्केट येथे झाली. यात श्री. माईनकर यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केलीअसा आरोप आहे. याबाबत श्री. कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात पोलिसांकडे एक कॉल रेकॉर्ड वगळता पुरावा नव्हता. त्यामुळे उच्च न्यायालयाने पोलिसांची विनंत अमान्य केली. त्यानंतर स्थानिक न्यायालयातील याचिकेतील सुचनेनुसार खंडणीची मागणी केल्याची तक्रार गंगापुर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT