जळगाव : शहरात (Jalgaon) अमृत आणि भुयारी गटारी योजनेची कामे झाल्यामुळे जळगाव शहराच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेऊन केली आहे. (Nitin Pawar wrote a letter to CM for famine in Kalwan Area)
मुंबई येथे मंत्रालयात आमदार भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे, की गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगाव शहरात विकास कामांना अडथळा निर्माण करण्यात आला आहे. शहरात विविध विकास कामे ठप्प झालेली आहेत.
शहराच्या विकासाच्या दृष्टीने सुरेश भोळे यांनी रस्त्यांच्या कामांकरिता नुकतेच ५ कोटी रुपये निधी मंजूर केला. मात्र त्याचबरोबर शहरात विविध विकासकामे व रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थानअंतर्गत १०० कोटी निधी मिळावा, या मागणीचे पत्र दिले आहे. सदरचा निधी उपलब्ध झाल्यास शहरात अनेक विकास कामांना चालना मिळेल व शहराचा चेहरामोहरा बदल्यासाठी मदत होईल आणि नागरिकांना समस्यांपासून दिलासा मिळेल.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.