Gokul Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gokul Zirwal : छाती फाडली, तर शरद पवार दिसतील, वडिलांविरोधात विधानसभेसाठी शड्डू; नरहरी झिरवाळांच्या पुत्राचं 'शरद पवार प्रेम'!

Politics in Nashik by Narahari Zirwal and Gokul Zirwal : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांनी शरद पवारांवरचे प्रेम व्यक्त केले. शरद पवार यांच्या पक्षाकडून संधी मिळाल्यास वडिलांविरोधात विधानसभा लढवू, अशी भूमिका गोकुळ झिरवळ यांनी घेतली.

Pradeep Pendhare

Nashik Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या पक्षाशी निगडीत असलेले पवार कुटुंबियासह अनेक नेत्यांचे घरात फुट पडली. एकाच घरातील माणसं, पण कोणी शरद पवार, तर कोणी अजित पवार यांच्याबरोबर आहेत. राष्ट्रवादीसह बाप-लेकांमध्ये देखील फूट पडली. असाच फुटीचा प्रकार आमदार नरहरी झिरवाळ यांच्या कुटुंबातून समोर आलाय.

आमदार नरहरी झिरवाळ यांचा पुत्र गोकुळ यांनी शरद पवार यांच्याबरोबर असून, त्यांनी संधी दिल्यास मी वडिलांविरोधात लढण्यास तयार आहे, अशी भूमिका जाहीर केली. गोकुळ झिरवाळ यांनी ही भूमिका जाहीर करताना, "मी महाविकास आघाडीत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे, माझी छाती फाडली, तर त्यात शरद पवार दिसतील", असे विधान केले आहे. त्यामुळे गोकुळ झिरवाळ चर्चेत आलेत.

गोकुळ झिरवाळ यांनी त्यांच्या राजकारणाची सुरवात कशी झाली, याची भक्कमपणे बाजू मांडताना त्याचे श्रेय शरद पवार (Sharad Pawar) यांना दिले. "माझ्या राजकारणाची सुरवात शरद पवार यांच्याकडे बघून झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी मी पहिल्यापासून काम करतोय. मी लोकसभा निवडणूक देखील लढण्यास इच्छुक होतो. मी महाविकास आघाडीत असून, शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीत आहे. माझी छाती फाडली, तर शरद पवार दिसतील. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय आणि करत राहणार", असे गोकुळ झिरवाळ यांनी सांगितले.

गोकुळ झिरवाळ यांचे वडील आमदार नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आहेत. परंतु गोकुळ यांनी आगामी राजकीय वाटचालीची भूमिका समोर येत स्पष्ट केली. त्यामुळे नाशिकमधील दिंडोरीमध्ये विधानसभा निवडणुकीत पिता-पुत्रांमध्ये आमना-सामना रंगण्याची चिन्हं आहे. तसं गोकुळ झिरवाळ यांनी वडिलांच आव्हान देण्यास सुरवात दिली आहे. गोळुक झिरवाळ यांनी म्हटले आहे की, शरद पवार साहेबांनी आदेश दिल्यास वडिलांच्या विरोधात लढण्यास तयार आहे. कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं असतं. विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे. नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात लढण्याची देखील इच्छा आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास, मी लढाई सोपी करून दाखवले, असा दावा गोकुळ झिरवाळ यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ यांनी जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला गोकुळ झिरवाळ सहभागी झाल्याने त्यांच्या भूमिकेविषयी चर्चेला उधाण आले. गोकुळ झिरवाळ दिंडोरी (जि. नाशिक) मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर नरहरी झिरवाळ काही निर्णय घेतात का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गोकुळ झिरवाळ यांचा आक्रमक पवित्रा पाहून ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असून, त्यांची तयारी दिसते. लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवण्याची देखील तयारी दर्शवली होती. परंतु दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर झाली. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झिरवाळ वेगळा निर्णय घेतात का, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT