Avinash Abhyankar
Avinash Abhyankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये गद्दारांमुळे मनसेची सत्ता गेली!

Sampat Devgire

औरंगाबाद : शिवसेना (Shivsena) सत्तेत आहे. त्यांनी या शहराची (Aurangabad) काय अवस्था केली आहे. इथे प्यायला पाणी मिळत नाही. राज ठाकरे (Raj Thakre) यांनी नाशिकमध्ये पुढील पन्नास वर्षे टिकेल अशी योजना राबविली आहे. तेथे केवळ गद्दारांमुळे मनसेची सत्ता गेली, असे प्रतिपादन मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) यांनी केले.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा झाली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, हे बुद्धीमान व हुशार नेते सध्या रोज सकाळी मिडीयाच्या भोंग्यांतून अजान देत असतात. ते राज ठाकरे यांच्यावर सतत टिका करीत आहेत. त्यांची मला कीव येते.

ते म्हणाले, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे देश ढवळून निघाला आहे. मात्र मळमळ यांना होत आहे. ते म्हणतात भाड्याने गर्दी आणली आहे. मात्र ही गर्दी भाडेसे नाही, दिलसे आणि मनसे आहे. राज ठाकरे यांना एैकायला आली आहे. ही गर्दी देशाला नवी चालना देणारी असेल. औरंगाबाद शहराचा कायापालट करण्याचा मंत्र राज ठाकरे देणार आहेत. त्याने या शहराला पाणी मिळेल. कायापालट होईल. नाशिक शहरात आमची सत्ता होती. तीथे मुकणे धरणातून पाणी योजना राबवून राज ठाकरे यांनी पुढील पन्नास वर्षांचा नाशिकचा प्रश्न सोडवला. तीथे सत्ता गेली ती फक्त गद्दारांमुळे गेली आहे.

ते पुढे म्हणाले ही गर्दी फक्त संभाजीनगरसाठी नाही, तर सबंध देशाला नवा संदेश देणारी आहे. तुम्ही ही गर्दी पाहिली ती अजिबात विसरु नका. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी या नेत्याने पक्ष काढला. अनेक संकट पचवली. अनेक समस्या सोडवल्या. देशाला दिशा दिली मात्र ते डगमगले नाहीत. त्यामुळे ते सांगतील ते आपण जीवाच्या आकांताने करा. येणाऱ्या मुंबई, ठाणे, नाशिक आणि सर्व निवडणूकांत केवळ मनसेचाच झेंडा विजयी करायचा आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT