Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नितीन गडकरींपुढे शिवसेना खासदार हेमंत गोडसेंनी घेतला यु टर्न!

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल के. के. वाघ महाविद्यालय ते जत्रा हॅाटेल विस्तारीत उड्डानपूलाचे लोकार्पण झाले.

Sampat Devgire

नाशिक : केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते काल के. के. वाघ महाविद्यालय ते जत्रा हॅाटेल विस्तारीत उड्डानपूलाचे (Extension of Flyover) लोकार्पण झाले. खरे तर शिवसेनेचे (Shivsena) खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी घाई-घाईत ८ ऑगष्टलाच या पूलाचे उद् घाटन केले होते. त्यामुळे काल झालेल्या कार्यक्रमात त्यांनी यु टर्न घेतला. (He took u turn) ते म्हणाले, `छे छे मी उद् घाटन नव्हे तर वाहतूक सुरु केली होती.`

के. के. वाघ महाविद्यालय ते हॅाटेल जत्रा विस्तारीत उड्डानपूलाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण श्री. गडकरी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन पद्धतीने झाले. खरे तर दोन महिन्यांपुर्वी के. के वाघ ते आडगाव दरम्यान उड्डाणपूलाचे उद्‌घाटन शिवसेनेच खासदार हेमंत गोडसे यांनी पालकमंत्री व सगळ्यांना टाळून शिवसेनेच्या मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत केले होते. तो कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला होता. यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करता आले असते, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली होती.

सोमवारी झालले्या सोहळ्यात सपशेल माघार घेतली. मी केवळ उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला होता. उड्डाणपुलाचे लोकार्पण केलेल नव्हते, असा यु टर्न घेतला. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT