eknath khadse-raksha khadse
eknath khadse-raksha khadse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपला मोठा धक्का; रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद

Rajanand More

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank Election) भाजपला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्या सून व भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तसेच माजी आमदार स्मिता वाघ (Smita Wagh) यांचाही एका गटातील अर्ज बाद करण्यात आल्यानं राष्ट्रवादीचे (NCP) निवडणुकीतील पारडे जड झाले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांचाही अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादीलाही धक्का बसला आहे.

भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी महिला राखीव व इतर मागासर्वग या दोन गटात अर्ज दाखल केला होता. पण दोन्ही अर्ज छाननीत बाद झाले आहेत. एका अर्जावर त्यांची सहीच नसल्याचे समोर आले आहे. रक्षा खडसे या पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरल्या होत्या. त्यामुळे खडसे कुटुंबातच सामना रंगणार होता. पण रक्षा खडसे यांचे दोन्ही अर्ज बाद झाल्याने ही निवडणूक आता एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल असून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे व ते स्वतः या पॅनल मधून निवडणूक लढत आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर रक्षा खडसे व एकनाथ खडसे यांचा आमने सामने आले नाहीत. मात्र, आता ते पॅनलच्या माध्यमातून आमने सामने येण्याची शक्यता होती. पण आता बँकेवर एकनाथ खडसे यांचेच वर्चस्व राहील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीत संचालकांच्या 21 जागांसाठी एकूण 279 अर्ज आले होते. त्यापैकी रक्षा खडसे यांच्यासह स्मिता वाघ, संतोष चौधरी आदी प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे. ही निवडणूक 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीची मुदत आहे. बुधवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली. वाघ यांचा अमळनेर विकास सोसायटीतील अर्ज बाद झाला आहे. तर महिला गटातून त्यांचा अर्ज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील बिनविरोध निवडून येणार आहे.

मुक्ताईनगर विकास मतदारसंघातून एकनाथ खडसेही बिनविरोध निवडून येतील. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचाही याच मतदारसंघातून अर्ज आहे. पण त्या अर्ज मागे घेण्याची चिन्हं आहे. त्यांचा महिला राखीव मतदारसंघातूनही अर्ज असून या मतदारसंघात त्याही बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT