Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut News; श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिलेला हिस्ट्रीशीटर गुंड कोण आहे?

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekbath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी आपल्याला ठार मारण्याची सुपारी दिल्याची तक्रार केली होती. हा गुंड म्हणजे खंडणी, जन्मठेपेची शिक्षा झालेला हिस्ट्रीशीटर (Crime) राजा ठाकूर (Raja Thakur) असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता ठाणे (Thane) पोलिस (Police) काय करणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. (Thane police recored MP Sanjay Raut`s statement on his alligation)

श्री. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की काही माहिती व घटना माझ्या कानावर आली. ती संबंधित यंत्रणेला कळविली आहे. आता त्यांचे काम ते करतील, माझ्या बाजूने विषय संपला आहे. गुंडांवर मी बोलत नाही. आता पोलिस त्यांचे काम करतील. जन्मठेप व खंडणीचे आरोप असलेल्या गुंडांचे संबंध मुख्यमंत्र्यांबरोबर आणि त्यांच्या पुत्रांबरोबर असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला.

यासंदर्भात राऊत यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई आणि ठाणे पोलिस आयुक्तांना तसे पत्र लिहिले होते. त्याची दखल घेत ठाणे पोलिसांच्या पथकाने नाशिकमध्ये येत राऊत यांचा सहापानी जबाब नोंदवून घेतला.

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप राऊत यांनी करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई आणि ठाणे पोलिस आयुक्तांना तसे पत्र लिहिले होते. त्याची दखल घेत ठाणे पोलिसांच्या पथकाने नाशिकमध्ये येत राऊत यांचा सहापानी जबाब नोंदवून घेतला.

जबाबानुसार चौकशी केली जाणार असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. वर्तकनगर विभागाचे सहायक आयुक्त गजानन काब्दुले व गुन्हे शाखेकडील खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्यासह पथकाने बुधवारी सकाळी खासदार राऊत थांबलेल्या हॉटेल एक्स्प्रेस इन येथे भेट घेतली.

राऊत यांचा सहा पानांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. द्याप पुरावे उपलब्ध नसल्याने मिळालेल्या जबाबाच्या सहाय्याने तपास सुरू असल्यचे सांगत अधिक माहिती देणे ठाणे पोलिसांनी टाळले. दरम्यान मात्र नाशिक शहर पोलिसांनी खासदार राऊत यांच्या सुरक्षेत कोणतीही वाढ केली नसल्याचे सांगत, प्रोटोकॉलनुसार बंदोबस्त असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT