Udayanraje
Udayanraje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Udayanraje News; राजकारणात निवृत्तीचे वय ठरलं पाहिजे!

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे (Udayanraje) विविध विषयांवर बेधडक मत व्यक्त करतात. आपल्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याची फारशी चिंता ते करीत नाहीत. आत्ताही त्यांनी राजकारणात (Politics) निवृत्तीचे वय असावे असे म्हटले आहे. तरुणांना संधी केव्हा संधी मिळणारअसा प्रश्न त्यांनी केला. (How much shall youth wait for chance in politics)

तरुणांनी राजकारणात यावे असे सातत्याने विविध नेते आवाहन करीत असतात. यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीत त्यामुळेच सातत्याने परिवर्तन झालेले दिसते. त्यात तरुणांना संधी मिळते. मात्र मुख्य प्रवाहात प्रस्थापित नेतेच महत्वाच्या पदांवर विराजमान असतात, ही सध्याची स्थिती आहे.

महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजुर झाला. त्याबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य राष्ट्रपुरुषांबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते.

त्यासंदर्भात ते म्हणाले, राजकारणात निवृत्तीचे वय असावे. माझा काही कुणाशी व्यक्तीद्वेष नाही. मात्र त्यांचे वय बघता त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. त्यामुळे आता राजकारणात देखील निवृत्तीचे वय ठरलं पाहिजे.

आपण नेहमी म्हणतो की, तरुणांना वाव दिला पाहिजे. ऐन उमेदीतील वर्षे प्रतिक्षा करण्यात जातात हे समजून घेतले पाहिजेत. राज्यपाल या पदावर अनुभव असलेले, पण वय जास्त नसलेल्या व्यक्तींचा नियुक्तीविषयी विचार करावा.

खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्य उभारले. त्यासाठी लढाया केल्याचे सांगितले. ते म्हणाले, जगात अनेक मोठे योद्धे होऊन गेलेत. मात्र त्यांनी आपले साम्राज्य वाढविण्यासाठी युद्ध केलीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या कल्याणासाठी राज्य केले. त्यांनी देशाला आपले कुटुंब मानले. आता परिवार म्हणजे फक्त मी आणि मी एव्हढं व्यक्तीकेंद्रित झालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT