Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : 'खासदार लंके काय करतील, याचा नेम नाही'; कांद्याच्या माळा घालून संसद...

Maha Vikas Aghadi MPs along with Nilesh Lanke raised slogans for onion price guarantee : कांद्याला हमीभाव मिळावा, यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि नीलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. खासदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घाऊन हे आंदोलन केले.

Pradeep Pendhare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात कांद्याने चांगलेच रडवले. परंतु हा कांदा महायुतीचा काही पिच्छा सोडण्यास तयार नाही. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी लोकसभा संसद भवनाच्या पायऱ्यांवर गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले.

खासदार सुप्रिया सुळे आणि नीलेश लंके यांनी कांद्याच्या हमीभावासाठी घोषणा देत संसद भवन दणाणून सोडलं. 'कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे', 'शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय', अशी घोषणाबाजी खासदार नीलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद परिसर दणाणून सोडला.

'शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे', 'शेतकरी (Farmer) विरोधी सरकारचे करायचे काय', 'खाली डोकं वर पाय', 'कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे', 'किसान विरोधी मोदी सरकार शरम करो, शरम करो', 'किसान विरोधी मोदी सरकार हाय हाय', 'किसान की फसल को एमएसपी दो', 'किसानपर अन्याय बंद करो', अशी आक्रमक घोषणाबाजी करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) संसदेतील गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नीलेश लंके यांनी केले. आंदोलनात माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे गुरूजी, शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी सहभागी झाले होते. इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेल्या टीडीपी, समाजवादी पार्टीच्या खासदारांनीही या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या या जिव्हाळयाच्या प्रश्‍नावर जोरदार घोषणाबाजी केली.

खासदार नीलेश लंके यांनी नगर जिल्ह्यात देखील दूध आणि कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून आंदोलन केले होते. या आंदोलनात नगर जिल्ह्यातून शेतकरी एकटवला होता. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लोकसभा निवडणुकीत कांद्याला हमीभावासाठी संसदेत लढा देणार, वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी संसदच बंद पाडत असतो, असा इशारा नीलेश लंके यांनी दिला होता.

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर खासदार नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर दिल्लीत कामकाज सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश लंके संसदेच्या कामकाजात प्रभावीपणे सहभागी होताना दिसत आहेत. कांद्याला हमीभाव मिळवून देण्याच्या शब्दाला त्यांना कितपत यश येते, हा येणारा काळच सांगले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT