नाशिक : इतके दिवस शासन (Government) व राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) प्रशासन कर्मचाऱ्यांना (Employees) रुजू व्हा, असे आवाहन करत होते. आता कर्मचारी रुजू व्हायला तयार आहेत; पण प्रशासन टाळाटाळ करत आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांचे समर्थन करणारे कर्मचारी देखील रुजू करून घ्यावे यासाठी आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
बडतर्फ केलेल्या ५४८ कर्मचाऱ्यांपैकी सुनावणीअंती ५४ कर्मचाऱ्यांना कामावर हजर करुन घेतले आहे. राहिलेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात धडक घेत रुजू करुन घेण्याची मागणी केली. मात्र अपील व अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच कर्मचाऱ्यांना रुजू घ्यावे लागणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा व कर्मचारी यांच्यात काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला होता. येत्या आठवड्यात सुनावणी व अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अशा कर्मचाऱ्यांनाही कामावर हजर करुन घेतले जाणार असल्याचे सांगत वाद मिटविण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी बडतर्फे झाल्यावर अधिक आक्रमक होत संपाचे वकिल अॅड गुणरत्न सदावर्ते यांचे समर्थन करीत होते. आता हे बडतर्फे कर्मचारी सेवेत रुजू करून घ्यावे म्हणून आक्रमक झाले आहेत. मात्र प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे येवला आगारातील ३५ जण बडतर्फ असून त्यांना रुजू करण्यास आगार व्यवस्थापकांनी नकार दिल्याने हे कर्मचारी आक्रमक झाले आहे.येथे जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी नाशिक येथे विभाग नियंत्रकाकडे दाद मागितली आहे.
गेले तीन चार महिने तापेलेले एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता शमले असले तरी आंदोलनानंतरचे कवित्व व त्याआडून राजकारण सुरूच आहे.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार एसटी कर्मचारी कामावर परतत असून २२ एप्रिलपर्यत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हजर करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते.येथेही जवळपास सर्वजण रूजू झाले असले तरी नाशिकच्या विभागीय नियंत्रकाकडील अपिलाचे कारण दाखवत ३५ बडतर्फ कर्मचाऱ्यांना हजर करून घेण्यास आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी नकार दिल्याने कर्मचाऱ्यांनी नाशिक विभागीय नियंत्रकाकांडे धाव घेत हजर करून घेण्याची मागणी केली. यावर येत्या ३० एप्रिल पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना हजर करून घेण्यात येईल असे आश्वासन विभागीय नियंत्रक कुवर यांनी दिल्याने बडतर्फ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अगर प्रमुखांनी आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना सवलत देऊन इतरांवर कारवाई केली असून कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव केला जात आहे,असे गाऱ्हानेही यावेळी कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रकाकडे मांडल्याचे सांगण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांना दुजाभाव न करता सोबत घेऊन चालण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली.दरम्यान,काही वेळानंतर आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड हे कार्यालयात हजर झाले असता कर्मचाऱ्यांना हजर करून घेणे बाबत महामंडळाच्या परिपत्रकानुसार त्यांना सर्वप्रथम विभागीय नियंत्रक यांच्याकडे अपील करावे लागणार असून त्यांच्याकडील सुनावणीनंतर या कर्मचाऱ्यांना हजर केले जाईल अशी माहिती गुंड यांनी दिली.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.