Nashik News : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अखेर महायुतीचा मार्ग मोकळा झाला असून अपक्ष गोकुळ गिते यांची समजूत घालण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले. यामुळे अपक्ष गोकुळ गीते यांनी आपली तलवार म्यान केली असून पुन्हा एकदा नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीने शिवसेनेला जागा सोडली होती. शिवसेना पक्षाने माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीवरून सहकारी पक्षात बंडखोरीचे लोन पसरले होते.
यासंदर्भात भाजपचे मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेना पक्षाचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांनी भाजप बंडखोरांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात गणेश गिते आणि दुसऱ्या टप्प्यात प्रसाद हिरे या भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतली. मात्र नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गिते यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.
गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिते यांना मुंबईला प्राचारण केले होते. मात्र मुख्यमंत्री फडणवीस राज्याबाहेर होते. आज यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीस शिवसेना पक्षाचे उदय सामंत यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे तसेच भाजपचे गणेश गिते आणि अपक्ष गोकुळ गिते हे देखील उपस्थित होते. या बैठकीत मिळालेल्या आश्वासनानंतर गोकुळ गीते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शविली आहे.
याबाबत उद्या सकाळी 11 वाजता नाशिक येथे अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. संदर्भात दराडे यांच्या वतीने दुजोरा देण्यात आला आहे. गोकुळ गिते यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. गोकुळ गिते यांनी सातत्याने आपण अपक्ष उमेदवारी करणार आहोत. आपल्याला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आपण भारतीय जनता पक्षाशी संबंधित नाही. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दाखविलेली नाही असा दावा केला होता.
आज झालेल्या मुंबईतील बैठकीत मात्र अपक्ष गोकुळ गिते यांनी आपली तलवार म्यान केली आहे. या निवडणुकीत सदस्य संख्या विचारात घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारी दाखल केली नव्हती. त्यामुळे आता नरेंद्र दराडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
नरेंद्र दराडे गेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून निवडणुकीत उतरले होते. आमदार झाल्यानंतर त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. यंदाच्या निवडणुकीत त्यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. यानिमित्ताने गेले काही दिवस गिते आणि दराडे यांच्यात सुरू असलेल्या राजकीय वाद आता संपुष्टात येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.