Sanjay Raut & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena UBT: संजय राऊत यांचा आरोप, म्हणाले, गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्तांकडून फक्त ठेकेदारी अन् नाशिकची लूट

Mumbai Shiv Sena Uddhav Thackeray on the streets against Girish Mahajan on the Nashik Municipal Corporation pothole issue -संजय राऊत भडकले; शिवसेना ठाकरे पक्ष आता गिरीश महाजन यांना दणका देणार, नाशिककरांसाठी होणार मोठे आंदोलन!

Sampat Devgire

Sanjay Raut News: नाशिक शहरातील खड्डे हा आता राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. सामान्य नागरिकांच्या जीविताला त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत सहा नागरिकांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे आक्रमक झाली आहे.  

शहरातील खड्डे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे हा आता भाजपची आणि प्रशासनाची डोकेदुखी बनला आहे. नियोजनाचा अभाव असल्याने ही कामे नागरिकांना त्रस्त करीत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक संतप्त आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष या स्थितीचा लाभ उठविण्याच्या मनस्थितीत आहे.  

नाशिक शहरातील नागरिकांच्या या भावना महापालिकेच्या विशेष महासभेतही प्रकट झाल्या. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांना आणि प्रशासनाला धारेवर धरले. सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामे व त्यामुळे होणारे अपघात याची जबाबदारी कोणावर? या प्रश्नाने त्यांनी महापौर्यांना धारेवर धरले. 

आज शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे, महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी मुंबईत शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. महासभेत झालेला गदारोळ आणि खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासन विरुद्ध नगरसेवक असे चित्र आहे. त्याची माहिती खासदार राऊत यांनी घेतली. 

खासदार राऊत नाशिक शहरातील समस्या आणि खड्डे यावर संतप्त आहेत. हे शहर अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले आहे. मात्र गेल्या दहा वर्षात शहराची दुरावस्था झाली. त्याला मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री गिरीश महाजन जबाबदार असल्याचा आरोप राऊत यांनी केला. 

या प्रश्नावर आता शिवसेना महापालिका आणि कुंभमेळा आयुक्त तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करणार आहे. आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भाजपच्या कारभाऱ्याला आव्हान दिले जाईल. शिवसेना पूर्ण ताकतीनिशी जनतेला त्रस्त करणाऱ्या या प्रश्नावर रस्त्यावर उतरेल, अशी घोषणा राऊत यांनी केली. 

कुंभमेळ्याची तयारी आणि नाशिक शहर याबाबत सध्या नागरिक अत्यंत त्रस्त आहेत. आतापर्यंत सहा नागरिकांचा मृत्यू झाला तर एक हजाराहून अधिक नागरिक अपघातांमध्ये जखमी झाले आहेत. सहा जण कोमात आहेत. ही जबाबदारी प्रामुख्याने महापालिका प्रशासन आणि कुंभमेळा आयुक्तांची आहे. त्यांच्याकडून सध्या केवळ ठेकेदारी सुरू आहे. साधुसंतांनी कुंभमेळ्यासाठी या खड्ड्यांमध्ये पडण्यासाठी यायचे आहे का?. असा प्रश्न करीत शिवसेना ठाकरे पक्ष आता कुंभमेळा प्रशासन आणि मंत्री गिरीश महाजन यांना दणका देईल, अशी घोषणा राऊत यांनी केली. 

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT