Sumit Wagh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: `पक्षांतर` फळलं की नडलं? भाजपच्या `कमळा`त जाताच हॉटेलवर पालिकेचा `बुलडोझर`!

Municipality bulldozer on BJP leader Sumit Wagh's hotel, deemands remove encroachments of others too-उपनगराध्यक्ष आणि भाजप नेते सुमित वाघ यांना अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची मोठी किंमत मोजावी लागली

Sampat Devgire

BJP News: सटाणा नगरपालिकेने शहरातील अतिक्रमेने काढण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा मोठा फटका उपनगराध्यक्ष असलेल्या भाजप नेत्याला बसला. त्यामुळे नगरपालिका आगामी काळात कोणती अतिक्रमणे काढते याकडे लक्ष लागले आहे. 

हल्लीच्या निवडणुकांमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे सोयीनुसार पक्षांतर होते. त्याची लाभ हानी देखील सोसावी लागते. सटाणा येथील उपनगराध्यक्ष आणि भाजप नेते सुमित वाघ यांनाही त्याचा फटका बसला आहे. 

सटाणा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष असलेल्या सुमित वाघ हे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून भाजपवासी झाले होते. पालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. यामध्ये शनिवारी नगरपालिकेचा बुलडोझर वाघ यांच्या हॉटेलवरच चालला. तुमचे हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले. 

सटाणा शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी ही मोठी कारवाई झाली. यामध्ये वाघ यांचे हॉटेल आपले उपकार पाडण्यात आले. बस स्थानक आणि परिसरातील तब्बल सत्तर वर्षांपासून विविध ते राजकीय नेत्यांचे बैठकीचे व राजकीय हालचालींचे केंद्र होते. 

नगरपालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम जोरात राबवली आहे. विविध दुकानांच्या पुढे उभारण्यात आलेल्या शेड्स पानटपऱ्या शीतपेयांची दुकाने आणि गटारीवरील दुकाने यामध्ये टार्गेट करण्यात आले. त्यामुळे सबंध शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

शहराच्या बस स्थानकापासून पूर्वेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील विविध बांधकामे पाडण्यात आली. त्यात पंधरा ते वीस पक्की दुकाने टपऱ्या एका रात्रीतून हटविण्यात आल्या. या मोहिमेमुळे शहरवासीय चकित झाले आहेत. त्यांनी मोहिमेचा दसका घेऊन स्वतःहून अतिक्रमण काढले

या अतिक्रमणाचा फटका विविध राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे नगरपालिकेची ही मोहीम राजकीय दबावातून किती दिवस चालते यावर खलबते सुरू आहेत. नगरपालिकेने मात्र शहरातील अनधिकृत बांधकामे काढून रस्ते मोकळे करण्याचे ध्येय जाहीर केले आहे. 

अतिक्रमण मोहिमेचा फटका उपनगराध्यक्ष असलेल्या भाजप नेते वाघ यांना बसला. त्यांनी आपल्या हॉटेलचा अतिक्रमित भाग काढण्यासाठी स्वतःहून तयारी दाखवली. आता नगरपालिकेने शहरातील इतर अतिक्रमणे काढावीत. नगरपालिकेच्या ठरलेल्या मापदंडानुसार गटार ते गटार असे रस्ते मोकळे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT