EC Decision on NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

EC Decision on NCP: राष्ट्रवादी आमचीच; कर्जतमध्ये आनंदोत्सव, तर नगरमध्ये सन्नाटा

Pradeep Pendhare

Nagar Political News: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय मंगळवारी निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार यांच्या जामखेड-कर्जत मतदारसंघातील कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने फटाके फोडत आणि पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. बाळासाहेब शिंदे यांनी आमचीच खरी राष्ट्रवादी असल्याची प्रतिक्रिया दिली. नगर शहरातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये मात्र सन्नाटा होता. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि युवकचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला.

तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे म्हणाले, "निवडणूक आयोगाने ज्याच्याकडे बहुमत त्याचा पक्ष याप्रमाणे अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व धुरा सोपवली आहे. पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे राहणार आहे.

यामुळे कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह व आनंद आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याचा फायदा पक्षास आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात होईल. या निर्णयाचे तालुक्यातील जनतेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देतो".

युवकचे तालुकाध्यक्ष संतोष धुमाळ म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

यामुळे माझ्यासह सर्व युवकांना मनस्वी आनंद झाला आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होणार आहे".

कर्जत तालुक्यातील सर्व युवकांच्यावतीने निवडणूक आयोगाचे आभार मानतो, असेही धुमाळ यांनी म्हटले. युवक अध्यक्ष संतोष धुमाळ, काकासाहेब पांडुळे, दीपक भोसले, नितीन जगताप, अभिजित शिंदे, संजीवन गायकवाड उपस्थित होते.

आमचा पक्ष आमचं चिन्ह शरद गोविंदराव पवार साहेब...

घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी आणि सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी "आमचा पक्ष आमचं चिन्ह शरद गोविंदराव पवार साहेब.." या आशयाचे पोस्ट शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या छायाचित्रासह सोशल मीडियावर झळकत होते. राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आणि पक्ष अजित पवार यांच्याकडे जाणे शरद पवार गटास मोठा धक्का मानला जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT