Bribe News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ACB News: महसूलमंत्र्यांच्या संस्थेकडून मागितली लाच! वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Radhakrishna Vikhe Patil: दहा हजारांची लाच घेताना पकडले

सरकारनामा ब्यूरो

मोबीन खान

Nagar: पेट्रोलपंपाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात दहा हजारांची लाच घेताना श्रीरामपूर येथील वजनमापे निरीक्षकाला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. वजनमापे निरीक्षक अशोक श्रीपती गायकवाड (वय ५२) याच्याविरोधात ही कारवाई झाली आहे. राज्याचे महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेकडे लाचेची मागणी करण्यात आली होती.

महसूलमंत्री यांची संस्था असलेली राधाकृष्ण विखे-पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या वतीने प्रवरानगर येथे पेट्रोलपंप चालविण्यात येतो. तक्रारदार हे या पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी

करून स्टॅपिंग प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात श्रीरामपूर येथील वजनमापे कार्यालयातील वजनमापे निरीक्षक गायकवाड याने १२ हजार रुपयांची मागणी केली होती.यासंदर्भात पेट्रोलपंप व्यवस्थापकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली.

या तक्रारीनुसार पथकाने प्रवरानगर येथील पेट्रोल पंपावर पंचासमक्ष पडताळणी केली. त्यात आरोपीने आधी १२ हजारांची मागणी केली होती. तडजोडीनंतर त्याने १० हजार रुपये घेण्याचे मान्य केले.ही रक्कम पेट्रोलपंपावर देण्याचे ठरले. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पेट्रोलपंपावर सापळा रचला. त्यात आरोपीला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर पथकाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT