Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Patil : नगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देणे भूषणावहच : विखे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : नगर जिल्ह्याचे नामकरण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे, असा प्रस्ताव आहे, त्याला सर्वांचाच पाठिंबा आहे. अहिल्यादेवी यांचे जन्मगाव नगर जिल्ह्यात आहे. त्यांचे नाव जिल्ह्याला देणे, हे भूषणावहच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव सरकारकडे आहेत. त्याबाबतचा निर्णय आपण करू, असे नगर व सोलापूरचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. (Naming the Nagar district Ahilya Devi nagar Bhushanavhach: Radhakrishna Vikhe Patil)

विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे आज सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, नगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. याशिवाय आणखी काही मागण्या आहेत. तसेच,नगर जिल्हा विभाजनाच्या बाबतीत देखील प्रस्ताव आहेत. जे जे मोठे जिल्हे आहेत, त्या बाबत राज्य सरकार एकत्रितपणे निर्णय घेईल.

छत्रपती संभाजी नगरच्या बाबतीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची भूमिका ही पहिल्यापासून विरोधाची आहे. राज्य सरकारने ठराव करून केंद्रपर्यंत पाठपुरावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी त्यांना संमती दिली. याआधी केवळ वल्गना केल्या जात होत्या. औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणाऱ्यांचा महाविकास आघाडीच्या काळात सत्कार होत होता.

याच एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा होताच ना. इम्तियाज जलिलच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का? हे त्यांनी जाहीर केले पाहिजे, असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला केला आहे.

देशपांडेंवरील हल्ल्याबाबत विखे म्हणाले...

राजकारणामध्ये मतभेद असतात. वैचारिक मतभेद असतात, राजकीय मतभेद असतात. पण, थेट प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत मजल जाते, यातून ठाकरे यांच्या शिवसेनेचे नैराश्य दिसून येते. आतापर्यंत जो त्यांनी गुंडगिरीच्या माध्यमातून वरचष्मा ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याला कुठेतरी आता छेद जातोय. सामान्य माणूसही आता मोकळेपणाने बाहेर पडतयात. बाळासाहेबांच्या शिवसेनेशी देखील लोकं जोडले जात आहेत. मनसेसोबत लोकं जोडले जातं आहेत, त्याचं वैफल्य ठाकरे शिवसेनेत दिसतंय, असे संदीप देशपांडे यांच्या हल्ल्याबाबत विखे म्हणाले.

कसब्यातील पोटनिवडणुकीवर उपमुख्यमंत्री भूमिका मांडतील

कसबा पोटनिवडणुकीतील पराभवाबाबत विखे पाटील म्हणाले की, पक्ष कमिटी, उपमुख्यमंत्री हे त्या बाबतीत आपली भूमिका मांडतील. कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये अशा निवडणुका झाल्यानंतर विचार मंथन हे होतच असतं. भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे, जो विजय मिळवण्याचे हे दृढ झाले आहे. एखादा पराभव जेव्हा होतो, तेव्हा अशा बातम्या होतात. पण, त्याबाबत काय कारणमिमंसा आहे, त्यासंदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस, पक्षाचे वरिष्ठ करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT