Dr. Radhakrishna Vikhe Patil & Nana Patole
Dr. Radhakrishna Vikhe Patil & Nana Patole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe-Patil News; नाना पटोलेंनी स्वतःचे नाक सांभाळावे

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दुसऱ्यावर टीका करण्याऐवजी स्वतःचे नाक सांभाळावे. राज्यात काँग्रेसची काय अवस्था झाली आहे आधी यावर विचार करावा, अशी टीका महसूल मंत्री (Revenue) राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी केली. (Minister Radhakrishna Vikhe Patil criticized Congress Leader Nana Patole)

श्री समर्थ सेवा मार्गाच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्ताने विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंगळवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देशातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवार मिळू शकला नाही, हे दुर्दैव असल्याची टीका केली. यामुळे भाजपचे नाक कापल्याचा टोला त्यांनी लगावला होता. त्याच उत्तर देताना विखे पाटील यांनी नाना पटोले यांनी स्वतःचे नाक सांभाळावे असे प्रतिउत्तर दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर आरोप करताना मला अटक करण्याचे प्रयत्न होते, असा आरोप केला त्यावर बोलताना पाटील यांनी फडणीस यांनी वस्तुस्थिती मांडल्याचे सांगितले. कृषी व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले, राज्यात पणन व्यवस्था सक्षम झाली नाही, हे दुर्दैव आहे कृषी व पणन विभागाची सांगड घालणे गरजेचे आहे.

दोन्ही खाते स्वतंत्र असतात राज्यात कारखान्यांचे कर्ज होते केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर यात दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली. गौण खनिजासंदर्भात पुढील आठवड्यात धोरण जाहीर केले जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT