Tukaram Mundhe transfer protection Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना बदली पासून संरक्षण द्या, नंदुरबारच्या नागरिकांची मागणी!

Nandurbar residents support Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धडाक्याने आदिवासी भागात भेसळीचे पामतेल गायब, भेसळखोरांना भरली धडकी.

Sampat Devgire

Tukaram Mundhe latest administrative developments: नंदुरबारसह राज्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलात भेसळ केली जाते. भेसळी विरुद्ध तपासणीची कोणतीही यंत्रणा नसल्याने गैरप्रकार वाढत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींपासून तर संघटनांपर्यंत सगळ्यांनी तक्रारी केल्या आहेत.  

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पामतेल आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली. या विरोधात विधिमंडळातही पडसाद उमटले होते. मात्र तपासणीची यंत्रणा आणि प्रयोगशाळांच्या मर्यादा यामुळे भेसळ करणाऱ्यांना संरक्षण मिळत असल्याची स्थिती आहे. 

अन्न व औषध प्रशासन विभागात तुकाराम मुंढे आयुक्त झाले. त्यांनी कारवाईचा धडाका लावला. प्रशासनावर मुंढे यांचा वचक असल्याने त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग सक्रिय राज्यभर सक्रिय झाल्याचे चित्र आहे. 

या कारवाईचे नंदुरबार आणि तळोदा परिसरातील आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. अनेक संघटनांनी याबाबत मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. स्थानिक ग्राहक पंचायत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. 

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते. त्या विरोधात नंदुरबारच्या नागरिकांनी आवाज उठवला आहे. तुकाराम मुंढे धडाडीचे काम करीत असल्याने त्यांना बदलीपासून संरक्षण द्यावे. त्यांची बदली करू नये अशी मागणी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

ग्राहक पंचायत संघटनेचे अध्यक्ष डॉ संजय कुमार शर्मा, कीर्तीकुमार शहा, ॲड अल्पेश जैन प्राध्यापक शांताराम राणे अशोक सूर्यवंशी यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील अन्य संघटनांनीही आदिवासींची भेसळयुक्त पामतेल आणि इतर खाद्यपदार्थ विक्री करून फसवणूक होते. त्यावर नियंत्रण आल्याचे म्हटले आहे. 

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आमश्या पाडवी यांनी गेल्या आठवड्यात विधान परिषदेत भेसळी विरुद्ध आवाज उठवला होता. नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तेलात भेसळ केली जाते. बाबत कारवाई केल्यावर दोन वर्षांपासून बंगलूर येथील प्रयोग शाळेतून अहवाल आला नाही.

त्यामुळे व्यापाऱ्यांना भेसळयुक्त तेल परत करावे लागले. हा गैरकारभार केव्हा थांबणार आणि नंदुरबारच्या आदिवासींना संरक्षण कसे मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. पार्श्वभूमीवर सामाजिक संघटनांनी तुकाराम मुंढे यांना आपले समर्थन दिल्याने, तो चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT