Nandurbar Mayor Election: Ratna Raghuwanshi vs Sangeeta Mali Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Politics: रणधुमाळीत अनोखे द्दश्य: शिंदे सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे ठाकरेंच्या उमेदवाराने केले औक्षण

Nandurbar Mayor Election: Ratna Raghuwanshi vs Sangeeta Mali: त विरोधी पक्षाच्या उमेदवार असलेल्या रत्ना रघुवंशींना शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. आरती ओवाळत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी संगीता माळी यांचे पती खंडू माळी देखील उपस्थित होते.

सरकारनामा ब्यूरो

सागर निकवाडे

नगरपरिषद आणि नगरपलिका निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापलं आहे, उमेदवारांचे आरोप–प्रत्यारोप सुरु असून जोरदार मोर्चेबांधणीही सुरु आहे. अशाच वातावरणात एक अनोखे, सौहार्दाचे आणि सकारात्मक राजकीय चित्र नंदुरबारमध्ये पाहायला मिळाले.

नगरपालिका प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारासाठी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचारासाठी गेलेले शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रत्ना रघुवंशी यांच्या रॅलीला व प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

प्रचारात विरोधी पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता खंडू माळी यांच्या परिसरात गेले असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संगीता माळी या स्वतः त्या ठिकाणी उपस्थित झाल्या.

निवडणुकीतील अटीतटीची स्पर्धा बाजूला ठेवत त्यांनी मोठेपण दाखवत विरोधी पक्षाच्या उमेदवार असलेल्या रत्ना रघुवंशींना शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. आरती ओवाळत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी संगीता माळी यांचे पती खंडू माळी देखील उपस्थित होते.

या अनपेक्षित आणि सकारात्मक प्रसंगामुळे परिसरात काही वेळ उत्सुकता पसरली होती. दोन्ही उमेदवारांनी एकत्र उभे राहत लोकशाहीतील निरोगी मूल्ये आणि परस्पर आदराचे उदाहरण घातले. यावेळी दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांनीही संयम राखत टाळ्या देऊन स्वागत केले. निवडणूक कितीही कठीण असली तरी परस्पर सन्मानाची भावना जिवंत राहते, हे पहायला मिळाले.

शा प्रसंगांमुळे राजकारणातील कटुता कमी होण्यास मदत होते.निवडणूक प्रचारात दिवसागणिक तापमान वाढत असतानाच घडलेले हे सौहार्दाचे दृश्य नंदुरबार नगरपालिकेच्या राजकारणात सकारात्मकता निर्माण करणारे ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT