Ajit Pawar Eknath Shinde sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Navapur Nagar Parishad Result: नवापुरात अजितदादांची जादू; नंदुरबारमध्ये शिदेंनी मैदान मारलं; महायुतीचं पारडे जड

Nandurbar Navapur Nagar Parishad Election Result 2025: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीचा मोठा विजय. अजित पवार व एकनाथ शिंदे गटाचा प्रभाव कायम.

सरकारनामा ब्यूरो

सागर निकवाडे

Nandurbar Politics News: नंदुरबार आणि नवापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निका लात साम टीव्हीने वर्तवलेला एक्झिट पोलचा अंदाज तंतोतंत खरा ठरला.या विजयामुळे दोन्ही शहरांमध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

नंदुरबार नगरपरिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी यांनी 11 हजार 110 मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. 41 जागांच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत शिंदे सेनेने 29 जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले. तर मित्रपक्ष भाजपने 8 जागा जिंकल्या. एमआयएमला 4 जागांवर यश मिळाले आहे.

नवापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आपली ताकद दाखवण्यात यशस्वी ठरली. येथे जयवंत जाधव 3 हजार 653 मतांनी विजयी झाले आहेत. 23 पैकी 20 जागांवर अजित पवाराच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 2 आणि भाजपला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले. या निकालाने नंदुरबार जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात सत्ताधारी महायुतीचे पारडे जड असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

तळोदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधीलच पक्षांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळाली. मात्र मतदारांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दर्शवला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांनी सातव्या फेरीअखेर 3,428 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासाठी स्वत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोदा येथे जाहीर सभा घेतली होती. भाजपच्या प्रचारासाठी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभांचा धडाका लावला होता. मात्र, एवढी मोठी रसद असूनही भाजप आणि शिवसेनेला मतदारांनी नाकारले आहे.

एकूण 21 जागांच्या या रणसंग्रामात राष्ट्रवादीने 11 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची फौज असूनही शिवसेना शिंदे गट 7 जागांवर अडकली आणि भाजपची अवस्था तर अत्यंत बिकट झाली असून त्यांना केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. नंदुरबार जिल्ह्यात भाजपला मिळालेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT