Maharashtra municipal house tax cancellation news: नंदुरबार नगरपालिकेचे अंदाजपत्रक नुकतेच सादर करण्यात आले. यामध्ये अनेक धाडसी निर्णय समाविष्ट आहेत. राजकारणाच्या पलीकडे जात नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे.
नंदुरबार नगरपालिकेचे अंदाजपत्रक नुकतेच प्रशासनाला सादर करण्यात आले. यामध्ये रस्ते, नाले सफाई, स्वच्छता, पथदीप आणि पाणीपुरवठा आदी कामांवर भर देण्यात आला आहे. या अंदाजपत्रकाला प्रशासनाने राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविले आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नगरपालिका निवडणुकीत नागरिकांना विविध आश्वासने दिली होती. नंदुरबार शहरावर यापूर्वीही आमदार रघुवंशी यांची सत्ता होती. यंदा भाजपनेते माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी रघुवंशी यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र आमदार रघुवंशी यांना मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी पदभार स्वीकारतात मोठा निर्णय घेतला आहे. घरातील २२५ चौरस फुटांपर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ करण्यात आली आहे. त्याचा शहरातील बहुतांशी आदिवासी आणि अल्प उत्पन्नाच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी पहिल्या अंदाजपत्रकातच घरपट्टी बाबत केलेली घोषणा प्रत्यक्षात आणली आहे. नंदुरबार शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष परिश्रम करणार आहे. शहरातील सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष रघुवंशी म्हणाल्या, राजकारण केवळ टीका करण्यासाठी नसते. चांगले निर्णय घेण्यासाठी नागरिकांनी आपल्याला सत्ता दिली आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. राजकारणात मतभेद असतातच. हे मतभेद शहरहितापेक्षा मोठे असता कामा नये, असे त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.
नंदुरबार शहरातील नागरिकांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने काही महत्त्वाचे निर्णय घेत दिलासा दिला आहे. आगामी काळातील कामाची दिशा यातून स्पष्ट झाली आहे. विरोधकांना हा एक संदेश मानला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.