Darade Vs Khaire: विधान परिषदेचे माजी सदस्य नरेंद्र दराडे यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. असे असतानाही आपल्या लेटरहेडचा दुरुपयोग केल्याची तक्रार त्यांच्याविरुद्ध पोलिसांत दाखल झाली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
येवला विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे कुटुंबीय आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. मात्र त्याआधीच या राजकीय वादाला एक नवे वळण मिळाले आहे.
श्री दराडे यांची विधान परिषदेची मुदत नुकतीच पूर्ण झाली. त्यामुळे ते माजी आमदार आहेत. श्री दराडे यांनी आपल्या शासकीय राजमुद्रा असलेल्या पत्राचा दुरुपयोग करून सार्वजनिक बांधकाम विभागाला एका कामासंदर्भात शिफारस केली होती.
माजी आमदार दराडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा देखील केली. आपण आमदार आहोत असा अविर्भाव आणल्याची त्यांच्या विरोधात तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजति पवार पक्षाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पोलिसात तक्रार केल्याने खळबळ उडाली.
तक्रारीवरून पोलिसांनी माजी आमदार दराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास सुरू असून पत्र व त्यालरील सही तपासणीसाठी फॉरेन्सीकप्रयोगशाळेत पाठविली आहे. त्यामुळे श्री दराडे चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
या बनावट पत्राबाबत आमदार दराडे यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत. संबंधित लेटर हेड माझे आहे. मात्र त्यावरील मजकूराविषयी काहीही सांगता येणार नाही. पत्राची सही देखील माझी नाही, असा असा पवित्रा त्यांनी घेतला.
दराडे यांच्या पत्राचा विषय किती गंभीर आणि त्यातून काय निष्पन्न होणार होते, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र यानिमित्ताने मंत्री भुजबळ आणि दराडे यांच्यातील राजकीय वादाला पुन्हा एकदा नवी फोडणी मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आहे.
मंत्री भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदार संघातून सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व कुणाला दराडे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांनी गेले वर्षभर येवला मतदारसंघात श्री भुजबळ यांच्या विरोधात निवडणुकीची तयारी केली आहे.
श्री. दराडे हे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणार आहेत. या स्थितीत भुजबळ विरुद्ध दराडे हे विधानसभा निवडणुकीत अपेक्षित असलेली राजकीय लढाई बनावट पत्र्याच्या निमित्ताने निवडणुकीआधीच सुरू झाली आहे.
नाशिकमध्ये लोकप्रतिनिधींच्या पत्रांच्या विविध घटना उघडकीस आल्या आहेत. महापालिकेच्या भरतीच्या खोट्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर लगेचच या भरतीबाबत महापालिका प्रशासनाचा बनावट ठराव झाल्याचे आढळळे. महापालिकेच्या आमदार निधीतील चार कोटींच्या कामाचा बनावट ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. त्यामुळे आमदारच चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यात माजी आमदार दराडे यांची भर पडली आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.