Arjun Munda
Arjun Munda Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला करोडो रुपये दिले, ते खर्च करा आणखी देऊ!

Sampat Devgire

सुरगाणा : जल, जंगल, जमीन हीच खरी आदिवासींची (Trible) ओळख आहे. मी भगवान बिरसा मुंडा यांच्या मातृभूमीतून देशातील आदिवासींचेच प्रतिनिधित्व करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकासमंत्री अर्जुन मुंडा (Arjun Munda) यांनी हतगड येथील आदिवासी शेतकरी व शेतमजूर या भाजपच्या (BJP public meeting) जाहीर सभेत केले. (Trible minister Arjun Munda said Modi Government allot crores of fund Maharashtra)

या वेळी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी मंत्री अशोक उईके, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कलावती चव्हाण, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे आदी होते.

या वेळी श्री. मुंडा म्हणाले, १५ नोव्हेंबर हा जागतिक आदिवासी गौरव दिन मोदी सरकारने सुरू केला आहे. आदिवासींचा खरा इतिहास या निमित्ताने उजेडात येत आहे. आदिवासींची ओळख ही केवळ जंगलात राहतो यापुरतीच नसून स्वाभिमान, राहणीमान, आनंदी जीवन पद्धती, अमूल्य सांस्कृतिक ठेवा अशी आहे. वन जमीन, जंगल यावरील अधिकार हा आदिवासींचाच आहे.

भाजप मोदी सरकारच्या काळात आदिवासींमधील कुपोषित, मागासलेला, रोजगार याकडे केंद्र सरकार लक्ष देत आहे. नवीन भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकरी, कामगार, आदिवासी, शेतमजूर, कारखानदार हे सर्वच एकदिलाने काम करीत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाला कोट्यवधी रुपये यापूर्वीच दिले आहेत. ते खर्च करीत नाहीत. ते खर्च करून आणखी पैशांची मागणी केली, तर दिले जातील.

या वेळी नगरसेवक विजय कानडे, जानकी देशमुख, रंजना लहरे, सुनील भोये, भरत भोये, कल्पना भरसट, ललिता कुवर, चंद्रकला गावित, निर्मला पवार, झेंडा थोरात, मुरलीधर ठाकरे, मनोहर जाधव, केशव म्हसे, जयप्रकाश महाले, वसंत महाले, दीपक देशमुख, योगेश महाले, मनीषा थोरात, श्याम पवार, राष्ट्रवादीचे आनंदा झिरवाळ, रामदास केंगा, पंडित घोटाळा आदी उपस्थित होते. या वेळी शेंद्रीय उत्पादन कंपनी साप्रोचे संचालक तुकाराम कर्डिले यांच्या प्रकल्पाची पाहणी केंद्रीय आदिवासी विकासमंत्री अर्जुन मुंडा यांनी भेट देऊन केली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, संजू पाटील, अन्न सुरक्षा मानव प्राधिकरण सचिव नवी दिल्ली, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, भाजप आदिवासी विकास आघाडीचे सरचिटणीस एन. डी. गावित, प्रकल्प अधिकारी विकास मिणा, आदिवासी क्षेत्रातील उद्योजक तुकाराम कर्डिले, समीर चव्हाण आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT