_narendra modi.jpg narendra modi.jpg
उत्तर महाराष्ट्र

Narendra Modi : सगळ्यांचा हिशेब व्हायला पाहिजे! ‘बदलापूर’चा उल्लेख न करता पंतप्रधान मोदींचं मोठं विधान...

Akshay Sabale

बदलापूरच्या नामांकित शाळेत घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. शाळेतील दोन चिमुकल्यांवर एक नराधमानं अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना समोर आल्यानंतर एकच संताप व्यक्त करण्यात येत होता. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलापूरच्या घटनेचा उल्लेख न करता अत्याचार करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.

"शाळा, रूग्णालय, कार्यालय आणि पोलिस ठाण्यात महिलांबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सगळ्यांचा हिशेब होणार. वरपासून खालीपर्यंत हा एकच स्पष्ट संदेश गेला पाहिजे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. ते जळगावातील 'लखपती दीदी' या मेळाव्यात बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "महिलांची सुरक्षा ही देशाची प्राथमिकता आहे. लाल किल्ल्यावरून वेळोवळी महिल्यांच्या सुरक्षिततेबद्दल मी आवाज उठवला आहे. महिलांचा राग आणि त्रास मी समजू शकतो. महिलांविरोधात गुन्हा हे अक्षम्य पाप आहे, असं मी देशातील प्रत्येक पक्ष आणि राज्य सरकारला सांगू इच्छितो."

"महिलांविरोधातील गुन्ह्यात कुणीही दोषी असला, तरी तो वाचला नाही पाहिजे. दोषीला कुठल्याही स्वरूपात मदत करणारे वाचले नाही पाहिजेत," असं मोदींनी ठणकावून सांगितलं.

"शाळा, रूग्णालय, कार्यालय आणि पोलिस ठाण्यात कुठेही महिलांबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सगळ्यांचा हिशेब झाला पाहिजे. वरपासून खालीपर्यंत हा एकच स्पष्ट संदेश गेला पाहिजे. सरकार येतील, जातील पण महिलांची सुरक्षा करणे आपलं दायित्व आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT