Narhari zirwal News : सकल धनगर समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने धनगड आणि धनगर एकच असल्याच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. तसेच धनगड आणि धनगर एकच असल्याच्या जीआर देखील सरकार काढणार आहे.
सरकारच्या या निर्णयावर आदिवासी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले, आमचा म्हणणं आहे की धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावं. पण आदिवासीमध्येच द्यावे हा हट्ट बरा नाही.
सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्या बैठकीला आम्हाला पण बोलवायला पाहिजे होते. किंवा आदिवासी विभागाच्या मंत्र्यांना, दोन वरिष्ठांना बोलवायला पाहिजे होते, असे म्हणत झिरवळ यांनी नाराजी व्यक्त केली.
झिरवळ यांनी आदिवासीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला आहे.धनगड आणि धनगर यावर शिंदे समितीने जो अहवाल दिला होत कोर्टाने रद्द केला आहे, असे देखील झिरवळ म्हणाले.
बैठकीला आम्हाला बोलवायला पाहिजे होते. पुढच्या आठवड्यात समजासाठी काही करणाऱ्या संघटना मिळून आम्ही आमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांना भेटून सांगू, असे देखील झिरवळ यांनी सांगितले. सरकारने परस्पर समितीने नेमल्याने संशय कल्लोळ निर्माण होईल.
धनगर आरक्षणासाठी सरकार समिती स्थापन करणार आहे. इतर राज्यातील धनगड आणि धनगर एकच आहे, याचा अभ्यास ही समिती अभ्यास करेल. त्यानंतर सरकार जीआर काढेल. जीआर काढण्यासाठी कायदेशीर अडचणी येऊ नये म्हणून सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळातील तीन सदस्य तसेच वरिष्ठ अधिकारी यांची एक समिती असेल. तसेच या निर्णयासाठी सरकार महाअधिवक्त्यांचा सल्ला घेणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.