Narhari Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shocking; झिरवाळांचा धक्कादायक खुलासा, `मला साधी नोटीसही मिळालेली नाही`

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा धक्कादायक खुलासा, आजपर्यंत मला साधी नोटीसही मिळालेली नाही.

Sampat Devgire

नाशिक : ठाकरे (Uddhav Thackrey) आणि शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी यावर प्रथमच माध्यमांसमोर भाष्य केले. एक नोटीस बजावून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास आणता येत नाही. साधा सरपंचावर जरी अविश्वास ठराव (No Confidence Motion) आणायचा असल्यास त्याला नोटीस बजवावी लागते, असे झिरवाळ यांनी यावेळी सांगितले. (Narhari claim that he did not get a single notice)

राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्याच दरम्यान राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला गेला, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र ज्यावर सर्वोच्च न्यायालयात कायद्याचा किस पाडला जात आहे, त्यात मला कधीही कोणतिही नोटीस मिळालेली नाही, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.

शिवसेनेतील बंडाबाबत सोळा आमदारांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाच्या संदर्भातील विषय थेट न्यायालयात गेला होता. त्यामुळे नरहरी झिरवाळ हे संपूर्ण देशभरात चर्चेत आले होते.

यावर शुक्रवारी झिरवाळ यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, एक नोटीस बजावून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास आणता येत नाही.

साधा सरपंचावर जरी अविश्वास ठराव आणायचा असल्यास त्याला नोटीस बजवावी लागते. त्यानंतर ओळख परेड होते किंवा त्यांचे म्हणणे सांगितले जाते आणि मग सरपंचावर अविश्वास ठराव आणला जातो.

माझी नियुक्ती ही सभागृहात झाली होती. तिथेच माझ्यावर अविश्वास ठराव आणला गेला पाहिजे ना? इथे तर फक्त नोटीस पाठविली होती. त्याला अविश्वास ठराव म्हणत नाही.

अविश्वास ठराव म्हणजे बहुमत घ्यावे लागते आणि तरचं माझ्यावर अविश्वास ठराव मंजूर होऊ शकेल ना, इथे तसे झाले नाही, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले. ज्या सभागृहाने माझी उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याच सभागृहात माझ्याविरोधात अविश्वास ठराव येणं अपेक्षित आहे.

मात्र तसे झालेले नाही. तसेच मेलवरून मला पाठवलेली नोटीस हा अविश्वास ठराव असेल आणि मी त्यानंतर घेतलेले निर्णय योग्य नसतील तर ज्या प्रमाणे आमदार अपात्रतेची कारवाई अयोग्य ठरेल, त्याचप्रमाणे नव्या सरकारमधील माझ्या उपस्थितीत झालेला नव्या अध्यक्षांचा शपथविधी कसा वैध धरता येईल? हा अत्यंत महत्त्वाचा सवालही झिरवळ यांनी यावेळी उपस्थित केला.

आता हे बंद झाले पाहिजे

सरकार म्हणून राज्यात जो विस्कळीत पणा आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे. आता हे एकदाचे बंद झाले पाहिजे. आम्ही रोज तेच ऐकतो. यात आमचे प्रश्न तसेच राहतात. अजूनही कुठेही ताळमेळ नाही. कोरोनाने दीड दोन वर्ष, २० वर्ष मागे गेले आहे. कोरोना हे नैसर्गिक संकट होते पण हे आपले कृत्रिम संकट आहे असेही नरहरी झिरवळ यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT