Devidas Pingle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik APMC : अजित पवारांच्या माजी खासदाराचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप; बाजार समितीचे दिवाळी काढले?

Nashik APMC Controversy: नाशिक बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे विद्यमान सभापती आणि माजी सभापती यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या निमित्ताने बाजार समितीच्या राजकारण तापले आहे.

Sampat Devgire

Nashik market committee corruption: नाशिक बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे विद्यमान सभापती आणि माजी सभापती यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या निमित्ताने बाजार समितीच्या राजकारण तापले आहे.

नाशिक बाजार समितीत दोन्ही इमारतींचे कामकाज बंद आहे. त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत कंत्राटदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांनी केला.

भाजप नेते आणि माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्या बाजार समितीतील कामकाजावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. बाजार समितीच्या उत्पन्नात ५० कोटींची घट झाली आहे. हे पन्नास कोटी कुठे आणि कोणाच्या खिशात गेले? असा प्रश्न पिंगळे यांनी केला.

नाशिक बाजार समिती शेतकऱ्यांची आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी कोणतेही काम सध्या सुरू नाही. शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम सभापतींचे नातेवाईक करतात. त्या नातेवाईकांकडून वसुली होते, असे पिंगळे म्हणाले.

सध्या बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करणे, दुय्यम ठरले आहे. सगळीकडे विक्रेत्यांसाठी टपऱ्या उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक बाजार समिती सध्या टपरी समिती झाली आहे.

ज्या दोन इमारतींच्या कामकाजाचा उल्लेख सभापती करतात, त्या इमारतींचे काम बंद झाले आहे. त्यात पदाधिकारी अडथळे आणत आहेत. या संदर्भात कंत्राटदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

सध्याचे कामकाज पाहता कोणतेही विधायक विचार आणि काम दिसत नाहीत. माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी पिंगळे यांच्या आरोपांना उत्तर दिले होते. असे उत्तर देण्याऐवजी त्यांनी कामाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला पिंगळे यांनी दिला.

बाजार समितीची सध्याची स्थिती विचारात घेता लवकरच ही संस्था डबघााईस नेण्याचा संकल्प विद्यमान सभापतींनी केल्याचे दिसते. संस्था वाचविण्यासाठी आम्ही शांत बसणार नाही. या संदर्भात पणन संचालक आणि मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्याची योग्य वेळी चौकशी होईल. त्यातून नियमबाह्य कामकाज आणि आर्थिक घोटाळा उघड होईल, असा विश्वास माजी खासदार पिंगळे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT