MLA Controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Controversy : अशोक खरातच्या 'तंत्र-मंत्र'ला 39 आमदार शरण; राजीनामे घेण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट राज्यभर आक्रमक

CPI(M) announces statewide protest after revelation of 39 MLAs linked to Ashok Kharat case in Nashik : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या संपर्कांतील 39 आमदारांचे राजीनामे घेण्यात यावे यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्यभर निदर्शने करणार आहे.

Pradeep Pendhare

Ashok Kharat Nashik case : बुवाबाजीला शरण जात राज्यातील 39 आमदार नाशिकमधील विकृत भोंदू अशोक खरात याला भेटल्याचे आरोप होत आहेत. अशा आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी, या आमदारांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने केली आहे.

या आमदारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. 6) राज्यातील सर्व तालुक्यांत आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, असे पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

नाशिकमधील (Nashik) अशोक खरात याच्या बुवाबाजीला, तंत्र-मंत्र, भोंदूगिरीला शरण जात, सामील जात, राज्यातील 39 आमदार सामील झाल्याचा आरोप होत आहे. या आमदारांची यादी तातडीने राज्य सरकारने जाहीर करावीत. अशा आमदारांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने केली आहे.

लोकप्रतिनिधी हा संविधानिक पदावर असतो. संविधानाला जबाबदार असतो. संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची आणि तो जनतेत रुजवण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, तंत्र-मंत्र, जादूटोणा इत्यादी अंधश्रद्धेच्या गोष्टींना राजमान्यता मिळत असते. त्यामुळे सामान्य जनताही अशा भोंदूबाबांच्या भोंदूगिरीला बळी पडतात, असे कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) म्हटलं आहे.

मुख्यमंत्री गेल्याने सर्वसामान्य खरातकडे आकर्षित

दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी, खरात प्रकरणावर भाष्य करताना, राज्याचे मुख्यमंत्रीच खरात याच्याकडे गेल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्या व्यक्तिबाबत विश्वास निर्माण झाला. त्यामुळे अधिक लोक तिकडे आकर्षित झाले. अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक राजकीय व्यक्ती त्या ठिकाणी गेल्या. हे प्रकरण केवळ राज्यापुरते मर्यादित नसून ही संपूर्ण देशाच्या प्रतिमेला काळिमा फासणारी बाब आहे, असा घणाघात केला.

बंद खोलीत अनेक गोष्टी दडल्यात...

श्रद्धेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. खरातसारख्या व्यक्ती लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आहेत. त्या ठिकाणी अनेक गोष्टी बंद खोलीत घडत असल्याचे पुढे येत आहे. हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे, असेही निरीक्षण बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.

मंत्री विखेंचा सूचक इशारा

बाळासाहेब थोरात यांच्या अशोक खरात प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेवर, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, या प्रकरणाची पाळेमुळे शिर्डीत की संगमनेरमध्ये हे चौकशी समितीतून समजेल, असे सूचक प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT