CM Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात एकनाथ शिंदेंचीही चौकशी होणार? 2022 मधील विखे पाटील, केसरकरांसोबतचा दौरा वादात

ANIS demands probe in Ashok Kharat case; Home Department to investigate role during Eknath Shinde tenure under CM Devendra Fadnavis : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईची घोषणा करताना, अंनिसचं प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं निवेदन चर्चेत आलं आहे.

Pradeep Pendhare

Nashik Ashok Kharat case : विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकृती भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणावर आक्रमकपणे निवेदन करताना, कोणालाच सोडणार नसल्याचं जाहीर केलं. सरकारी अधिकारी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करणारे, सगळ्यांच धडा शिवकणार, असल्याचं म्हणत खळबळ उडवून दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनुसार विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही चौकशी होणार का? असा सवाल विचारला जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, अशोक खरातकडे गेल्याचा निषेध अंनिस नोंदवला होता. तसं अंनिसच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनुसार, शिंदेंची चौकशी होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गंवादे यांनी, भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात अंनिसने 2022 पासूनच आक्रमक भूमिका घेतल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना, शिर्डीला आले होते. तिथून पुढे ते अशोक खरात याच्या मंदिरात गेले होते. याचा खुलासा भाजपचे अहिल्यानगरमधील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाच्या सुरवातीलाच केला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2022 मध्ये विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या नाशिकमधील (Nashik) ईशानेश्वर मंदिरात गेले होते. त्यांच्याबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर देखील होते. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींची ही कृती म्हणजे, अंधश्रद्धेला बळ देण्याचा प्रकार होता.

अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या या कृतीचा निषेध केला होता. निषेध नोंदवणारं पत्र प्रांताधिकाऱ्यांना दिलं होतं, असा दावा देखील अ‍ॅड. रंजना गंवादे यांनी सरकारनामाशी बोलताना केला आहे. अ‍ॅड. गंवादे यांचा दावा, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदेंची चौकशी होणार असल्याची चर्चा आता रंगली आहे.

अंनिसची भूमिका आक्रमक

अशोक खरात प्रकरणात, एकनाथ शिंदेच काय, जे कोणी राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार, सेलिब्रेटी, सामाजिक कार्यकर्ते चौकशीत समोर येतील, त्यांची चौकशी झाली पाहिजे. नुसतं दोषी शोध नका, यांनी अंधश्रद्धला बळ दिल्याप्रकरणी कारवाई व्हायला हवी. नेत्यांचं अनुकरण कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकं करतात. वरमाई ... तर, वऱ्हाड ..., ही ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे. त्यानुसार कारवाई व्हायलाच हवी, अशी आक्रमक भूमिका अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी मांडली.

बाबा-बुवांमध्ये उन्मत्तपणा

सत्तातंर घडल्यानंतर, विशेष करून, 2014 पासून सत्तांतर झाल्यापासून या सर्व बाबा-बुवांमध्ये उन्मत्तपणा आला आहे. 2014 पूर्वी आम्ही, अशा अनेक भोंदूबाबांचा भांडाफोड केला. पण आता 2014 पासून या कामांना आता खीळ बसली आहे. लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे. या भोंदूंना रोखण्याची प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. तरी देखील आम्ही जीवावर बेतून, भीती न बाळगता, असुरक्षित वातावरण आम्ही लढा देत आहोत, असे अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT