उत्तर महाराष्ट्र

Nashik Assembly Election 2024 : पश्चिम विधानसभा मतदारसंघात हिरेच शांतता आणतील; मामा ठाकरे

पश्चिम विधानसभा मतदारसंघात गुंडगिरी आणि दहशतीला रोखायचे असेल आणि मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था राखायची असेल तर भाजपा महायुतीच्या उमेदवार सीमा महेश हिरे यांना साथ देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांनी केले.

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : पश्चिम विधानसभा मतदारसंघात गुंडगिरी आणि दहशतीला रोखायचे असेल आणि मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था राखायची असेल तर भाजपा महायुतीच्या उमेदवार सीमा महेश हिरे यांना साथ देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांनी केले.

शुक्रवारी सकाळी सिडकोतील संभाजी स्टेडियम परिसरातून उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचारफेरीच्या वेळी ठाकरे बोलत होते. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण सिडको, सातपूर, इंदिरानगर भागाच्या विकासासाठी आमदार हिरे यांनी दहा वर्ष मेहनत घेतली असून, विकासाला अधिक गती देण्यासाठी त्यांना मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन ठाकरे यांनी यावेळी मतदारांना केले.

सिडकोतील विविध भागात सध्या सीमा हिरे यांच्या प्रचार फेऱ्यांचा धडाका सुरू आहे. काल सिडकोतील संभाजी स्टेडियम, अश्विन नगर, सह्याद्री नगर, अंबड पोलीस स्टेशन परिसर, सिंहस्थ नगर, मोरवाडी गाव, पंडित नगर, भाद्रपद सेक्टर आदी परिसरातून सकाळी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने सौ. हिरेंचे स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी लोक स्वतःहून घराबाहेर पडत होते.

तर गल्लीबोळातून अनेक जण स्वयंस्फूर्तीने प्रचार रॅलीत सहभागी होत होते. या रॅलीत उमेदवार सीमा हिरे यांच्या समवेत मामा ठाकरे, दिलीपकुमार भामरे, चंद्रकांत खाडे, राकेश दोंदे, श्यामकुमार साबळे, सनी रोकडे, कावेरी घुगे, मंदाकिनी जाधव, सोनाली ठाकरे, रवी पाटील, गोविंद घुगे, रेखा लिंगायत, यशवंत नेरकर, छाया परेवाल, हर्षा फिरोदिया, संजय गुंजाळ, जयश्री भावसार, ललिता भावसार, नलिनी दराडे,

डॉ. विनय मोगल, सुश्मिता लांडगे, पिंटू काळे, नलिनी दराडे, रोहन कानकाटे, प्रवीण सोनवणे, समाधान दातीर, अरुण दातीर, यशवंत पवार आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रचार रॅलीनंतर उमेदवार सीमा हिरेंसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचवटीतील जाहीर सभेसाठी रवाना झाले. भाजप, महायुती आणि सीमा हिरे यांचा जयघोष करण्यात येत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT