Jogendra Kawade joins BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jogendra Kawade Politics: प्रा. कवाडे भाजपबरोबर सत्तेत; माधवी जाधवला समर्थन देण्यासाठी आले अन् तोंडघशीपडले...

Jogendra Kawade Aligns with BJP Faces Setback While Backing Madhavi Jadhav: आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्या माधवी जाधव यांच्या पाठिंबावरून कार्यकर्त्यांनी कवाडे यांना सुनावले

Sampat Devgire

Maharashtra BJP alliance भाजपला पाठिंबा देणे प्रा. जोगेंद्र कवाडे यांना चांगलेच अडचणीचे ठरू लागले आहे. त्यावरून नाशिक येथे चळवळीतील एका महिलेने समर्थकांसमवेत प्रा. कवाडे यांना चांगलेच फटकारले. त्यामुळे चांगलाच वाद पेटला.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला होता.

या प्रकरणाने नाशिकच्या माधवी जाधव चांगल्याच चर्चेत आले आहेत. त्यांना आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. विविध नेत्यांनीही त्यांना समर्थन दिले. त्यामुळे त्या चर्चेत आहेत.

यासंदर्भात प्रा. जोगेंद्र कवाडे श्रीमती जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकला आले होते. प्रा. कवाडे शासकीय विश्रामगृहावर आले. त्यावेळी त्यांना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले.

प्रा. कवाडे यांनी महायुतीला अर्थात भाजपला पाठिंबा दिला आहे. ते सत्तेत सहभागी देखील आहेत. त्यांचा हा पाठिंबा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळे माधवी जाधव यांना पाठिंबा देण्यावरून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या दर्शना सौपुरे यांनी आक्षेप घेतला. आम्ही आंबेडकरी बिचाऱ्यासाठी रस्त्यावर उतरतो. पोलिसांच्या लाठया, काठ्या झेलतो. जेलमध्ये जातो. तुम्ही काय करता? असा परखड प्रश्न त्यांनी केला.

प्रा. कवाडे यांना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच हा प्रश्न करण्यात आला. त्यामुळे समर्थक आणि विरोधक असा वाद सुरू झाला. कवाडे यांच्या समर्थकांनी आम्हीही रस्त्यावर उचलून तुमच्याबरोबर आंदोलनात असतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

हा वाद सुरू झाल्यावर प्रा. कवाडे यांची चांगलीच पंचायत झाली. त्यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद शमला नाही. शासकीय विश्रामगृहाच्या आवारातच हा प्रकार घडला. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल देखील झाला.

त्यानंतर प्रा. कवाडे यांनी या प्रकरणी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. यावर त्यांनी आक्षेप घेतला. मंत्री महाजन यांनी माफी मागितलीच पाहिजे, या जाधव यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र यानिमित्ताने भाजपला पाठिंबा देण्यावरून प्रा कवाडे कार्यकर्त्यांच्या निशाणावर आले आहेत. चळवळीतील कार्यकर्त्यांनीही कबाडे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे माधवी जाधव यांना पाठिंबा देण्यावरून कवाडे यांना वेगळ्याच राजकीय पेच प्रसंगाला सामोरे जावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT