Himgauri-Aher-Adke  Himgauri-Aher-Adke
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: हंड्रेड प्लस साध्य केलेल्या भाजपची सत्तेत असूनही कोंडी; स्वपक्षिया॑कडूनच महापालिकेत घरचा आहेर!

Nashik BJP Himgauri Adke Municipal Corporation Mahasabha in a dilemma due to ruling party's agitation-भाजपचे नगरसेवक हांडे बाटल्यांसह महासभेत पोहोचल्याने भाजप महापौरांची झाली कोंडी

Sampat Devgire

Shivsena UBT News: महापालिकेत हंड्रेड प्लस घोषणा केलेल्या भाजपची सत्ता आली. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या साथीने महापालिकेत शंभरावून अधिक नगरसेवकांचे संख्याबळ आहे. संख्येची सत्तेला साथ असल्याचे चित्र आहे. 

मात्र महापालिकेच्या कारभाराने सत्ताधारी भाजपची पुरती कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारी झालेल्या महासभेत विरोधकांपेक्षाही सत्ताधारी भाजप नगरसेवकच आक्रमकपणे आंदोलन करीत होते. त्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. 

महापौर हिमगौरी आडके यांची कारभार करताना झालेली कोंडी महासभेत स्पष्टपणे दिसून आली. सिडको परिसरातील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक चक्क हांडे आणि बाटल्या घेऊन सभागृहात पोहोचले होते. पाण्याच्या प्रश्नावर सत्ताधारी नगरसेवकांना जनतेने हैराण केल्याचे पडसाद महासभेत उमटली. 

नाशिक शहरातील रस्त्यांचे खड्डे हा सत्ताधाऱ्यांचा गळ्याचा फास बनला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते केशव पोरजे आणि प्रथमेश गीते यांच्या नेतृत्वाखाली चक्क महासभेत आंदोलन झाले. त्यामुळे महापौर आडके यांची चांगलीच तारांबळ उडाली. 

यावेळी सिडको भागातील भाजपचे नगरसेवकही आंदोलनाच्या पावित्र्यात दिसले. नगरसेविका प्रतिभा पवार, छाया देवांग, भूषण राणे, शरद पडवळ हे भाजपचे नगरसेवक प्रशासनाविरुद्ध आक्रमक झाले होते. हांडे, बाटल्या आणि भांडी घेऊन सभागृहात ते पोहोचले. सत्ताधारीच प्रशासनाला कोंडीत पकडत असल्याने भाजप चांगलाच अडचणीत आला आहे.  

महापालिकेत १०० प्लसची घोषणा करून सत्ताधारी नेत्यांनी महापालिकेत सत्ता आणली. मात्र विविध प्रश्नांवर सरकार आणि मंत्र्यांकडून नगरसेवकांची पूर्ण नाकेबंदी करण्यात आल्याचे चित्र आहे. सत्ताधारी नगरसेवकांना शहरातील समस्या आणि नागरिकांच्या संतापाबाबत तोंड बंद करण्याच्या सूचना असल्याने भाजप चांगलाच कोंडीत सापडल्याचे चित्र दिसले. त्यात महापौर हिमगौरी आडके आणि इतर पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT