BJP- Shivsena Politics News: भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांनी गेले वर्षभर अतिशय शांतपणे ऑपरेशन लोटस राबवले. त्यासाठी भाजपने श्याम दाम दंड भेद नीतीचा वापर केला. तेव्हा महायुतीच्या सहकारी पक्षांना आनंद होत होता.
नाशिक महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत महायुती भावी अशी भूमिका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे. प्रत्यक्षात मात्र पडद्याआडून वेगळ्याच राजकारणाचा वास येत आहे.
आज महायुती होणार की नाही याचा फैसला होणार आहे. गिरीश महाजन आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करतील. या चर्चेत महायुती बाबत धोरण ठरेल.
महायुती व्हावी यासाठी भाजपपेक्षा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांचा अधिक आग्रह आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची अक्षरशः फरपट होताना दिसते. भाजप देईल ते स्वीकारण्याची या पक्षाची भूमिका आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी गेल्या वर्षभर अतिशय शांतपणे पक्षात इनकमिंग घडवून आणले. यावेळी शिवसेना शिंदे पक्ष प्रचंड गाजावाजा करीत उद्धव ठाकरे यांना आव्हान देत होता. जवळपास ३३ माजी नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांचा प्रवेश शिंदे पक्षाने घडवला.
शिवसेना शिंदे पक्षाचा गाजावाजा सुरू असताना त्याचे अप्रत्यक्ष आव्हान भाजपला मिळत होते. त्यांना गिरीश महाजन यांनी अतिशय नियोजनपूर्वक उत्तर दिले. शेवटच्या टप्प्यात भाजपकडे शिवसेनेसह विविध पक्षांचे प्रमुख नेते दाखल झाले. या ऑपरेशन लोटस चा फटका आता थेट शिवसेना शिंदे पक्षाला बसण्याची चर्चा आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपने महापालिका निवडणुकीची सूत्रे आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे दिली. सर्व निर्णय मात्र मंत्री महाजन हेच घेणार आहे. पक्षाकडे एक हजाराहून अधिक इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे स्वबळाचा दबाव वाढत आहे.
महायुती झाल्यास त्याचा फटका भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रबळ नेत्यांना बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी असा दबाव आहे. त्यामुळे नगरपालिकेत झालेला प्रयोग महापालिकेतही होण्याची दाट शक्यता आहे. यातून शिवसेना शिंदे पक्षाचे इच्छुक मात्र अस्वस्थ झाले आहेत.
---------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.