Shalarth-ID-Scam Shalarth-ID-Scam
उत्तर महाराष्ट्र

School Bogus ID: धक्कादायक; शाळेच्या शिपायाचा प्रताप; शिक्षणाधिकाऱ्यांशी संगणमत करून केली २३ कर्मचारी नियुक्ती!

Nashik bogus Shalarth ID 160 crore scam agent Tushar Salunkhe arrested -साक्रीच्या शाळेतील लॅब असिस्टंट चे होते शिक्षणाधिकाऱ्यांची आर्थिक व्यवहार, घोटाळा उघड

Sampat Devgire

Education crime News: शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शाळेतील शिपायाचे थेट जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांशी लागेबांधे उघड झाले आहे. त्यातूनच कर्मचारी नियुक्तीचा मोठा आर्थिक घोटाळा पुढे आला. 

शालार्थ आयडी घोटाळा तपासाच्या विशेष पथकाने काल तुषार साळुंके याला साक्री येथून अटक केली. साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे लॅब असिस्टंट असलेल्या साळुंके याने बनावट आयडीच्या माध्यमातून चक्क २३ कर्मचारी नेमले होते. त्यातून लाखो रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. 

प्रवीण साळुंके आणि त्याचा सहकारी प्रशांत वाडीले याची शालार्थ बनावट आयडी घोटाळ्यात मोठी भूमिका होती. या दोघांचा जिल्हा परिषदेच्या धुळे येथील शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे आणि मीनाक्षी गिरी यांच्याशी थेट संपर्क होता. दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी मोठ्या रकमा दिल्या. 

धुळे जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये साळुंके आणि वाडीले यांनी २३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. साठी बनावट शालार्थ आयडी तयार करून घेतला. त्यामध्ये शिक्षणाधिकारी अहिरे आणि गिरी यांनी त्याला सहकार्य केले. 

बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षण विभागात नियुक्त करण्यात या दोघांचाही हातखंडा होता. त्यांनी दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळांतर्गत वाल्मीक रुषी माध्यमिक विद्यालय व अन्य काही शाळांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन मंजूर करून घेतले. धुळे जिल्हा परिषदेत शिक्षण अधिकारी यांचा त्याला आशीर्वाद होता.  

विशेष तपास पथकाने यापूर्वीच संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्या तपासात साळुंखे आणि त्याच्या सहकार्याचे प्रताप उघड झाले. शाळेत शिपाई दर्जाची नोकरी असलेल्या कर्मचाऱ्यांनी 23 जणांना नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

नाशिकच्या विशेष तपास पथकाने संबंधितांना अटक केल्यावर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. विभागातील आवक जावक रजिस्टर तसेच अन्य शासकीय नोंदीतही त्याने घोटाळा केला. त्यांची येत्या सात सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. 

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT