Captain Ashok Kharat News: तांत्रिक कॅप्टन अशोक खरात याची चर्चा संबंध महाराष्ट्रभर होत आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांसमवेत त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्याच्या साम्राज्याचा प्रसार अफाट झाला आहे.
कॅप्टन अशोक खरात याचे राज्याच्या विविध मंत्र्यांसह अनेक नेत्यांची संबंध आहेत. यातील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना त्याची किंमत मोजावी लागली. त्यामुळे हे प्रकरण तापले आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री दीपक केसरकर यांचे नाव काही लोक खरात संदर्भात घेत आहेत. मंत्री केसरकर यांच्याशी संबंध असलेल्या एकाला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यामुळे कॅप्टन खरात आणि त्याचे राजकीय कनेक्शन पुन्हा चर्चेत आले.
मात्र योगायोग असा की २००३ मध्ये शहराच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कॅप्टन अशोक खरात यांच्या विरोधात तक्रार आली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाची तयारी करणाऱ्या विंचूर गवळी येथील एका संस्थेत कॅप्टन खरात तेव्हा वास्तव्यास होते. तेथेही त्यांचे वर्तन वादग्रस्त आढळले होते.
कॅप्टन खरात याने आपली 'बाबागिरी' तेव्हा नुकतीच सुरू केली होती. त्यातून एक प्रशिक्षणार्थी युवक आणि दोन युवती त्याच्या जाळ्यात अडकल्या. त्यांच्यावर अत्याचार झाल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.
ही तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी तातडीने पावले टाकत कॅप्टन खरात याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी एका माजी मंत्र्याने त्यात हस्तक्षेप करून खऱ्या त्याला मदत केली. काही राजकीय नेत्यांची मदत घेऊन व पोलिसांना मॅनेज करून कॅप्टन खरात याने त्या प्रकरणातून आपली सुटका करून घेतली.
या प्रकरणातील तक्रारदारांचे पुढे काय झाले? याची माहिती उपलब्ध नाही. मात्र २००३ मध्ये आलेल्या तक्रार अर्जावर पोलिसांनी गांभीर्याने कारवाई सुरू केली होती. त्यात नाशिकच्या एका माजी मंत्र्याने हस्तक्षेप केल्याने कॅप्टन खरात वाचले. अन्यथा पोलीस कारवाई झाली असती तर कदाचित कॅप्टन खरात यांचा उदय होण्याआधीच असतं झाला असता. त्यातून आजच्या राजकीय नेत्यांची सुटका झाली असती, हे मात्र नक्की.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.