Nashik Central Vidhan sabha election 2024 prashant jadhav criticize opposition 
उत्तर महाराष्ट्र

Nashik Central Vidhan sabha: जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना जागा दाखविणार; प्रशांत जाधव

पक्षबदल करून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना येथे बिलकूल थारा दिला जाणार नाही. कमळाला मताधिक्य देऊन प्रा. देवयानी फरांदे यांना विधानसभेत पाठवण्याची खूणगाठ मतदारांनी बांधली आहे. जुने नाशिकमधील प्रचारफेरीत नागरिकांनी निर्धार केला.

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : पक्षबदल करून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना येथे बिलकूल थारा दिला जाणार नाही. कमळाला मताधिक्य देऊन प्रा. देवयानी फरांदे यांना विधानसभेत पाठवण्याची खूणगाठ मतदारांनी बांधली आहे. जुने नाशिकमधील प्रचारफेरीत नागरिकांनी निर्धार केला. आपले मत विकासाला, पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या उच्चशिक्षित उमेदवाराला देणार असल्याचा दावा प्रचार फेरीनंतर शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केला.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये महायुतीच्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढली. या वेळी विधानसभा प्रवासी नेता आमदार अमुलभाई भट्ट, भाजप शहर उपाध्यक्ष सुनील फरांदे,

मध्य नाशिक विस्तारक पवन जाधव, अजिंक्य फरांदे, भाजप जुने नाशिक मंडल सरचिटणीस ॲड. पवन गुरव, उपाध्यक्ष रतन काळे, गणेश मोरे, सचिन मोरे, कविता तेजाळे, पुष्पा बेग, शिवा जाधव, कैलास हादगे, निखिल पवार, चेतन शेलार, नीलेश शेलार, संदीप आहेर, संदीप डहाके, नितीन ठाकरे, रमेश मानकर, चेतन व्यवहारे,

अथर्व करमासे, अविनाश वाळुंजे, कैलास देशमुख, संतोष दाते, अमोल मानकर, चंदन भास्करे, यश शिंदे, लोकेश सूर्यवंशी, अर्जुन डांगरे, शोभा जाधव, श्यामकांत बोरदे, नीलेश राऊत, अतुल क्षीरसागर, गोविंद विधाते, ओम पवार, अतुल बस्ते, पवन लुंगसे, तानाजी अष्टेकर, विद्या काठवते, कृष्णा ठाकरे, ओंकार काळे, राहुल डहाके,

युवराज तेजाळे, विकी जमदाडे, पार्थ मानकर, चेतन व्यवहारे, योगेश खैरनार, अनिकेत डांगरे, जय अहिरे, लोकेश सूर्यवंशी, वैभव पगारे, विकी सोपे, मयूर शिंदे, आकाश कासार, विशाल प्रभाणे, नुतनकुमार जाधव, सचिन बेलदार, शिवदास भोई दुर्गेश साळुंखे, विलास सनानसे आदी सहभागी झाले. चव्हाटा भागातून रॅली काढण्यात आली.

छपरीची तालीम, बुधवार पेठेतील सुभाष वाचनालय, गजराज चौक, हुतात्मा शिरीषकुमार चौक, मोदकेश्वर वसाहत येथे रॅलीचे स्वागत झाले. कुंभारवाडा, काझी गढी, शितळामाता चौक, शिवदृष्टी प्रतिष्ठान, स्वामी विवेकानंद चौक, स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर देवस्थानतर्फे प्रा. फरांदे यांचे स्वागत, सत्कार करण्यात आले.

कोळीवाडा परिसर, प्रगती सोसायटी, शिवनेरीनगर, भगवतीनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दंडे हनुमान मंदिर देवस्थानतर्फे स्वागत झाले. बुरूड गल्ली, चौक मंडई या मुस्लिमबहुल परिसरात बांधवांनी पाठिंबा दिला. महालक्ष्मी चाळ, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे रॅलीचे स्वागत करण्यात आले.

तसेच, प्रभाग १२ मधील गायकवाडनगर, प्रथमेशनगर, मातोश्रीनगर व गणेश कॉलनी परिसरात प्रशांत जाधव यांनी संपर्क साधला. या वेळी अभय छल्लाणी, नंदकुमार देसाई, नरेंद्र सोनवणे, प्रदीप पाटील, कैलास चौधरी, अविनाश जासुंदे, शिरीष भुमकर, भारती मोरे, मिनाक्षी वैद्य आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT