Nashik Mayor casts the first vote in the online bird symbol selection process. Sarkarmnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Bird Election News : कावळा की गिधाड? नाशिकच्या शहर पक्ष्यासाठी निवडणूक; महापौरांनी केलं पहिलं मतदान

Nashik City Bird Selection: Crow and Vulture in the Race : नाशिकचा शहर पक्षी अर्थात पक्षी मानचिन्ह निवडण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी महापौर हिमगौरी आडके यांनी पहिलं मतदान केलं, नाशिककरांना मतदानासाठी आवाहन करण्यात आलं आहे.

Ganesh Sonawane

Nashik City Bird Election News : हरित कुंभ संकल्पनेच्या धर्तीवर नाशिकचा शहर पक्षी अर्थात पक्षी मानचिन्ह निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नाशिकचे पक्षी मानचिन्ह म्हणून कावळा आणि गिधाड या दोन पक्ष्यांचे पर्याय नागरिकांसमोर आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्‍या हस्ते पक्षी मानचिन्ह निवडीसाठी तयार केलेल्‍या क्‍यूआर कोडचे अनावरण झाले. महापौर हिमगौरी आडके यांनी नाशिकच्या पक्षी मानचिन्ह निवडीसाठी पहिले मतदान केले.

कावळा आणि गिधाड या दोन्ही पक्ष्यांचे नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जीवनातील महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून, त्यांच्या सहभागातून नाशिकचे पक्षी मानचिन्ह निश्चित करण्याची ही संकल्पना आहे. यासाठी ऑनलाइन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नाशिककरांना दोन्ही पक्ष्यांची माहिती वाचून आपल्या पसंतीच्या पक्ष्याची निवड करता येणार आहे. या उपक्रमात नाशिकमधील शालेय व उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि पक्षी संवर्धनाचा संदेश सर्वदूर पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.

अशी आहे मतदानाची प्रक्रिया..

क्‍यूआर कोड स्कॅन करून नाशिककरांना मतदान करता येणार आहे. त्यासाठी क्‍यूआर कोड स्कॅन केल्यानंतर सर्वात आधी कावळा आणि गिधाड या पक्ष्यांची माहिती वाचावी. त्यानंतर आपल्याला योग्य वाटणाऱ्या पक्ष्याच्या पर्यायाला मतदान करावे.

आपले नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवून मतदानाचा फॉर्म सबमिट करावा. एका व्यक्तीला एकदाच मतदान करता येणार आहे. पक्षी सप्ताहानिमित्त ( ५ ते १२ नोव्हेंबर) सुरू झालेला उपक्रम नाशिकच्या पक्षीवैभवाची ओळख जनमानसात रुजवणारा आणि हरित कुंभाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक करणारा ठरेल. १० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने मतदान करता येणार आहे. १२ नोव्हेंबरला यांसदर्भात निकाल जाहीर होणार आहे.

क्‍यूआर कोड

पक्षीप्रेमी नाराज

मतदानासाठी केवळ कावळा व गिधाड हे दोनच पर्याय दिल्याने वाद निर्माण झाला आहे. काही पक्षीप्रेमींनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकचा शहर पक्षी निवडताना पक्षीमित्रांना व पर्यावरण संस्थाना विश्वासात घेण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT