Nashik Civil Hospital Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News: बापरे! जिवंत महिलेस केलं मृत घोषित; बेवारस महिलेला काही तास मिळाली ओळख...

Nashik Civil Hospital: पुन्हा नवीन कागदपत्रे तयार करीत मृत वृद्धेची नोंद बेवारस म्हणून नोंद...

Mangesh Mahale

Nashik: जिल्हा शासकीय रुग्णालयातील अजब कारभार समोर आला आहे. एका जिवंत महिलेला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक येथील रुग्णालयात झाल्याचे उघडकीस आले आहे. कागदपत्रांची अदलाबदल झाल्यामुळे हा प्रकार झाला. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील 'कारभार' पुन्हा चव्हाट्यावर आला आहे, पण काही तास का होईना बेवारस मृत वृद्ध महिलेला ओळख मिळाली होती. चूक लक्षात आल्याने मृत वृद्धेची पुन्हा ओळख बेवारस म्हणूनच करण्यात आली.

नाशिकरोड बस स्थानकात ६५ वर्षीय वृद्धेस शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या वृद्धेची ओळख पटलेली नव्हती. दरम्यान, वृद्धेचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला.

त्यामुळे रुग्णालयाने यासंदर्भात नाशिकरोड पोलिसांना कळविले होते. यासाठी रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे महिलेचे नाव व कागदपत्रे सोपवले. त्यानुसार पोलिसांनी महिलेच्या मृत्यूची नोंद केली. मात्र, काही वेळानंतर ज्या महिला रुग्णाच्या नावे मृत्यूची नोंद केली आहे. त्या नावाची रुग्ण महिला जिवंत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पुन्हा नवीन कागदपत्रे तयार करीत मृत वृद्धेची नोंद बेवारस म्हणून करण्यात आली.

बेवारस वृद्धेस ज्या महिलेचे नाव देण्यात आले आहे, तिच्यावर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे. ही बाब काही वेळाने लक्षात येताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर नव्याने कागदोपत्री मृत महिला अनोळखी आणि जिवंत महिला उपचार घेत असल्याचा उल्लेख करण्यात आला.

अनुसया सीताराम माळी या ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेदरम्यान शितळादेवी, अमरधाम, भद्रकाली येथे अशक्तपणा आल्याने बेवारस अवस्थेत आढळून आल्या. त्यांना रुग्णवाहिकेमार्फत ४ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनोळखी मृत महिलेचे नाव अनुसया माळी असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या संबंधितांनी आरोग्य यंत्रणेला माहिती देण्यात आली. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेने शवविच्छेदनासाठी कागदोपत्री नोंदी केल्या. पोलिसांनी पंचनामासुद्धा केला. दरम्यान, मृत महिलेचे नाव समजले नसल्याचे समोर आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT