Nashik Crime : नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत घडलेलं महिला लैगिंक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या पखालरोड परिसरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर क्लासचालक शिक्षिकेच्या मदतीने तिच्या भाच्याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी क्लासचालक महिलेसह तिच्या भाच्याविरोधात बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान क्लासचालक महिला व तिचा भाचा हे दोन्ही संशयित पसार झाले असून, पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे. पोलिस उपनिरीक्षक मुस्तफा शेख यांच्याकडे या केससचा तपास देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी पखाल रोडवरील 'कसक पार्क' येथे राशेदा शेख हिच्याकडे दहावीच्या क्लाससाठी नियमितपणे जात होती. जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या दरम्यान तिच्यावर क्लासचालक शिक्षिकेच्या भाच्याने वारंवार लैगिंक अत्याचार केले.
क्लासचालक राशेदा शेख हिने पीडित तरुणीवर नजर ठेवून तिला वेगवेगळ्या बहाण्याने घरातील बेडरूममध्ये पाठवले. तिथे तिचा भाचा सिबतेन याने पीडितेवर अत्याचार केले. ही बाब कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत संशयितांनी पीडितेवर दबाव टाकला होता.
संशयितांकडून पीडित तरुणीला कधी धमकावून, तर कधी प्रलोभने दाखवून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नाशिकमध्ये घडलेली ही घटना केवळ एक गुन्हा म्हणून न पाहता समाजासाठी गंभीर इशारा मानण्याची गरज आहे. क्लासेसमध्येच अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याने पालक, शिक्षक आणि प्रशासन या सर्वांनी अधिक सजग होणे आवश्यक आहे. मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे, त्यांच्या वागणुकीतील बदल ओळखणे आणि संशयास्पद परिस्थितीत त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच खासगी क्लासेसवर अधिक कडक देखरेख, पारदर्शक व्यवस्था आणि कठोर कायदेशीर कारवाई यामुळेच अशा घटनांना आळा घालता येऊ शकतो अशा भावना पालकांकडून व्यक्त केल्या जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.