Congress Agitation at Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Congress : केंद्र सरकार राहुल गांधी यांच्यावर सूड उगवत आहे.

न्यायालयाच्या निर्णयाने संतप्त कार्यकर्त्यांची नाशिक शहरात निदर्शने

Sampat Devgire

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकात केलेल्या भाषणातील `मोदी` आडनावावरून उल्लेखावरून गुजरातमधील कनीष्ठ न्यायालयाने केलेल्या शिक्षेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळली. या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Congress workers agitation in support of Rahul Gandhi)

काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या समर्थनार्थ संतप्त झालेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नाशिक (Nashik) शहरात काँग्रेस भवन येथे निदर्शने केली.

याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकदम तडका फडकी तसेच संबंधीत खटल्यात कमाल असलेली दोन वर्षाची शिक्षा करण्यात आलेले राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका अहमदाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच त्यांचा जामीन देखील रद्द केला. हा केंद्र सरकारचा अन्याय आहे. याबाबत केंद्रातील सरकार विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे लोकशाही विरोधी पाऊल असल्याचा संताप काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूक प्रचारात कर्नाटकात याबाबत केलेल्या विधानाविरोधात भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती.

शहराध्यक्ष आकाश छाजेड, नगरसेवक राहुल दिवे, डॉ. सुभाष देवरे, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, वत्सलाताई खैरे, उल्हास सातभाई, माजी नगरसेविका आशा तडवी, संदीप शर्मा, भालचंद्र पाटील, जावेद इब्राहीम, अल्समन शेख, फारूख कुरेशी, पारूख मन्सुरी, माजी नगरसेवक लक्ष्मणराव धोत्रे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा वंदना पाटील, गुड्डी खान, ज्ञानेश्वर काळे, शाहीद बाबा, आण्णा मोरे आदी सहभागी झाले.

...

भारतीय जनता पक्षाने सरकार काँग्रेस नेते राहूल गांधी यांची प्रचंड धास्ती घेतली आहे. त्यामुळे ते विविध यंत्रणांचा उपयोग करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. हा थेट लोकशाहीवर हल्ला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन झाले.

- आकाश छाजेड, शहर अध्यक्ष, काँग्रेस.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT