Rahul-Gandhi Rahul-Gandhi
उत्तर महाराष्ट्र

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांना दिला भाजपशी संघर्ष करण्याचा कानमंत्र; संघावर थेट हल्ला!

Nashik Congress LOP Rahul Gandhi district President President message Beware of RSS -राहुल गांधी यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांबरोबरच कुटुंबीयांशीही केला संवाद

Sampat Devgire

Congress News: काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचे वेगळे आणि आक्रमक स्वरूप गेले काही दिवस पुढे येत आहे. त्याची प्रचिती महाराष्ट्रातील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनाही आली. नाशिक येथील सृजन अभियानाचा समारोप गांधी यांनी केला. 

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष समवेत पाच तास वेळ घालवला. व्यक्तिगत संवाद आणि जिल्हाध्यक्षांच्या सूचना त्यांनी ऐकल्या. पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या शंकानाही उत्तरे दिली.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भाजपशी थेट संघर्ष करण्यावर भर देण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला. भाजप समाजात आणि व्यवस्थेत गोंधळ निर्माण करतो. अफवा पसरवून स्वतःचा प्रभाव वाढवण्यावर त्यांचा भर असतो. 

समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे भाजपच्या कारभाराविषयी युवकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक घटक संतप्त आहे. त्यांच्याशी संवाद साधण्यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा. 

भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांनी थेट आव्हान दिले. ही संस्था राज्यघटनेला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी प्रत्येक घटकाशी वेगवेगळे खोटे बोलते. म्हणून आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक करू नका. त्यांची पायरी चढू नका, असे राहुल गांधी म्हणाले.  

महाराष्ट्रातील एस आय आर प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगापासून कसे सावध राहावे हे सांगितले. राज्यात दोन कोटी मतदारांना वगळण्यात आले आहे. आणखी एक कोटी मतदार टार्गेटवर आहेत. यादीतून वगळलेल्या या घटकांचा संपर्क काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावा. मतदारांचा हक्क नाकारण्याचा प्रयत्न सत्ताधारी आपल्या सोयीसाठी करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार डॉ शोभा बच्छाव यांचं विविध वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT