Prithviraj Chavan News: राज्यातील काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांच्या सृजन अभियानाचा समारोप आज झाला. त्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकला आले होते. यांच्या निषेधारसाठी भाजपच्या महिलांनी आंदोलन केले. गांधी यांचा निषेध केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज नाशिकला आले होते. त्यांचा निषेध करण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार, महापौर हिमगौरी आडके, आमदार देवयानी फरांदे यांसह विविध नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. काळ्याफिती लावून राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला.
काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी लोकसभेत नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध केल्याने भाजपच्या महिलांनी त्यांचा निषेध केला. या आंदोलनाचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाचार घेतला. आंदोलनाबाबत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्ष महिला आरक्षणाचा जनक आहे. महिला आरक्षणासाठी माजी पंतप्रधान राहुल गांधी यांनी सर्वात आधी पुढाकार घेऊन काम केले. विविध क्षेत्रात महिलांना संधी मिळावी यासाठी काँग्रेसने योगदान दिले आहे.
काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी महिला आरक्षणाचा विरोध करतात हे कोणत्या मूर्खांनी भाजपला सांगितले?. कोणाचे ऐकून भाजपच्या महिलांनी हे हास्यास्पद आंदोलन केल? असा प्रश्न चव्हाण यांनी केला.
काँग्रेस पक्ष महिलांना संधी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतो. भाजपने आपले राजकारण दामटण्यासाठी यापूर्वीच सर्वसंमतीने मंजूर झालेल्या महिला विधेयकाला बाजूला टाकले आहे. वेगळ्याच हेतूने नारीशक्ती नावाने विधेयक आणले आहे. याची जाणीव भाजपच्या महिलांना नाही, हे हास्यास्पद वाटते.
भाजपची मातृ संस्था असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलांना आपल्या संघटनेत काय स्थान देतो? संघ महिलांना सरसंगचालकपदी नियुक्त करेल का? तशी हिंमत या संघटनेत आहे का? असा गंभीर प्रश्न आंदोलनकर्त्या महिलांना चव्हाण यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.