Kisan Sabha Long March Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

JP Gavit Politics: राज्य सरकार पुन्हा अडचणीत; पालघरला घेराव असताना आता नाशिकहूनही आदिवासींचा लॉंग मार्च मुंबईकडे!

Nashik CPM JP Gavit Aggressive tribals long march towards Mumbai on forest issue- दोन वेळा आश्वासने देऊनही राज्य शासन वनजमिनींचा प्रश्न सोडवू शकले नाही, त्यामुळे आंदोलक आक्रमक आहेत.

Sampat Devgire

Tribal Long March News: आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य शासनाने यापूर्वी दोन वेळा आश्वासने दिली. किसान सभेतर्फे मुंबईला लाँग मार्च काढण्यात आले होते. त्याबाबत मोर्चेकरी अद्यापही समाधानी नाहीत.

दोन वर्षांपूर्वी किसान सभेचे नेते माजी आhttps://www.youtube.com/watch?v=KrzWwrZtryQमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला लाँग मार्च काढण्यात आला होता. आदिवासी आणि शेतकरी नाशिकहून मुंबईला पाई पोहोचले होते. त्यावेळी शासनाने चर्चा करून विविध आश्वासने दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या किसान सभेच्या मोर्चाला यापूर्वी आश्वासन दिले होते. आश्वासन मिळाल्याने किसान सभेने आंदोलन मागे घेतले. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे.

आदिवासींच्या अतिक्रमित वनजमिनींचा प्रश्न तीव्र बनला आहे. या संदर्भात माकपचे माजी आमदार जे. पी. गावित आणि किसान सभा सातत्याने आक्रमक आंदोलन करीत आली आहे. त्यामुळे काही आदिवासींचा प्रश्न सुटला, मात्र ठोस कार्यवाही झालेली नाही.

राज्य शासनाने या प्रश्नावर तीन वेळा लिखित आश्वासने दिली होती. २०१८ मध्ये पहिल्यांदा मार्च काढण्यात आला. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. २०१९ मध्ये पुन्हा लॉंग मार्च काढला तेव्हा विल्होळी येथे महायुती सरकारच्या मंत्र्यांनी आश्वासन देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात घोषणा करून कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आदिवासींच्या या प्रश्नावर चौथ्यांदा आंदोलन करावे लागत आहे, असा दावा माजी आमदार गावित यांनी केला.

हा लाँग मार्च दिंडोरी आणि सुरगाणा यांसह जिल्हा भरातील आदिवासींनी काढला आहे. शनिवारी हा मोर्चा नाशिक शहराच्या सीमेवर येऊन धडकला. यावेळी वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आज सकाळी हा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे रवाना झाला. शहराच्या मध्यवस्तीतून आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून हा मोर्चा पुढे रवाना होईल. त्यामुळे या मागण्यांबाबत शासनाने चर्चेसाठी संबंधितांची संपर्क केला आहे. मागण्यांबाबत सरकारकडून आश्वासनाचा इजा बिजा झाल्याने आता ठोस कार्यवाही शिवाय माघार नाही, अशी आक्रमक भूमिका माजी आमदार गावित यांनी घेतली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT