Amalner Student Murder in Nashik Murder Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime: एकतर्फी प्रेमातून अमळनेरच्या विद्यार्थिनीची नाशिकमध्ये भररस्त्यात हत्या, हल्लेखोर युवक पसार

Amalner Student Murder in Nashik Murder:नाशिकच्या इंदिरानगरमध्ये अमळनेरच्या विद्यार्थिनीची कथित एकतर्फी प्रेमातून चाकूने हत्या. आरोपी युवक फरार असून पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू.

Sampat Devgire

Nashik Crime: नाशिक शहरात इंदिरानगर भागात भर रस्त्यात युवतीचा चाकूने भोसकून खून झाला. हल्लेखोर प्रसार झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरात महिला अत्याचार आणि गुन्हे वाढत आहेत. गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यात आता नवीन भर पडली.

इंदिरानगर भागात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. शिक्षणासाठी आलेल्या वैष्णवी अनिल आवारे (वय २०, रा, अमळनेर, जि. जळगाव) हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्लेखोर युवक घटनेनंतर पसार झाला.

संबंधित युवती अमळनेर येथील होती. ती शिक्षणासाठी नाशिकला आली होती. वनसंपदा कॉलनी परिसरात ती 'पेईंग गेस्ट म्हणून रहात होती. रात्री जेवणानंतर ती बाहेर फेरफटका मारायला आली होती.

बँक ऑफ महाराष्ट्र च्या मागच्या बाजूला ही घटना घडली. हल्लेखोर युवकाशी तिचा वाद आला. त्यानंतर युवकाने तिच्यावर चाकूने हल्ला केला. ती कोसळल्यावर चाकू तेथेच सोडून युवक पळून गेला.

नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी आली. मात्र हल्लेखोराचा कोणताही माघ मोस लागला नाही. फॉरेन्सिक पथकाने या भागात तपासणी केली. पोलिसांनी लगतचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली आहे.

या भागात राहणाऱ्या नागरिकांना दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ युवतीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे ते बाहेर आले असता युवती गंभीर जखमी अवस्थेत पडलेली दिसली. घटनास्थळी पोलिसांना हल्ला करण्यासाठी वापरलेला सुराही सापडला आहे.

शहरात रोज कोयता गॅंग कडून होणाऱ्या गुन्ह्यांची भर पडत आहे. महिला आणि विद्यार्थिनी यांच्यावर हल्ले वाढत आहेत. या संदर्भात पोलिसांनी काही भागात संशयतांवर कारवाई करून त्यांची धिंड काढण्याचे प्रकारही केले आहेत. मात्र गुन्हेगारांचे मनोबल कमी होण्याची चिन्हे नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT