Nashik Crime News : नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत घडलेलं धर्मांतर आणि लैंगिक छळवणुकीचे प्रकरण ताजे असतानाच, आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीला जबरदस्तीने दारू आणि सिगरेट पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. एवढच नाही तर तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करत तिच्या धार्मिक भावना दुखावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपी तंजीर इनामदार याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे. दरम्यान, आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास सुरु असताना घडलेल्या या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणीने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तंजीर इनामदार याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. तिथे तिला बळजबरीने दारू पाजली. तसेच सिगरेट पिण्यास भाग पाडले. पीडित तरुणीचे लैंगिक शोषण केले.
याप्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, संशयिताने पीडितेची धार्मिक ओळखच पुसण्याचा प्रयत्न केला. तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा तोडून टाकला. आरोपीने तिला एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे 'गजवा-ए-हिंद'चे पालन करण्यास सांगून धर्मांतरासाठी प्रचंड दबाव टाकला.
जानेवारी 2026 मध्ये संशयिताने पीडित तरुणीच्या गळ्याजवळ चावा घेऊन हे 'लव्ह बाईट' असल्याचे सांगत तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला वारंवार लॉजवर नेले आणि बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या सततच्या छळाला कंटाळून पीडितीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
दरम्यान, संशयित तंजीर इनामदार याला कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने युक्तीवाद करत त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. संशयित धर्मांतरण करण्यासाठी पीडित तरुणीला जबरदस्ती करायचा तसेच त्याने आणखी काही तरुणींना फसवले आहे का? याचा तपास करायचा आहे त्यासाठी पोलिस कोठडी मागितली. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.