Nashik News : नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांना सहकारी लिपिक नितीन जोशी यालाही लाच घेताना पकडण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. एसीबीच्या तपासात धनगर यांच्या बँक खात्यामध्ये १ कोटी १५ लाख रुपयांची रोकड आढळली आहे. आज (शुक्रवारी) त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
धनगर यांना पन्नास हजार तर जोशी याला पाच हजार रुपयांची लाच घेताना एसीबी नुकतेच पकडले होते. महापालिका मुख्यालयात सहा वाजेनंतर काम करता येत नाही, असे असताना धनगर या संध्याकाळी सहा वाजेनंतर संबंधितांना बोलावून घ्यायच्या असे तपासात उघड झाले आहे.
धनगर यांच्या निलंबनाचे आदेश शासनाच्या उपसचिवांनी जारी केले आहेत. लाचखोर उपनिबंधक सतिश खरे, सुनीता धनगर हे सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्या जामीन अर्जावर आज (ता. ९) सुनावणी होणार आहे. धनगर या गेल्या बुधवारपर्यंत (ता. ७) पोलीस कोठडीत होत्या.
लाच स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांचा आधार
लाच घेण्याच्या डिलसाठी खालच्या कर्मचाऱ्यांकडून नियमांचा आधार घेऊन आधीचं धावपट्टी तयार करायचे. त्यानंतर ठराविक रक्कमेत कमी-अधिक करून रक्कम निश्चित केली जायची. ती स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांचा आधार घेतला जायचा. या काळात रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. मी कामासाठी भरपूर वेळ देते, अशा गमजा धनगर मारायच्या. जोशी याला घरातूनचं पाच हजार रुपये आणण्याची ताकीद असल्याचे शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शिक्षक,संस्था चालक व या क्षेत्राशी संबंधित लोकांना कसे व किती पैसे द्यावे लागतात याच्या सुरस कहाण्या आता बाहेर पडू लागल्या आहेत. पैशांच्या देवाण -घेवाणीला कंटाळलेल्या काहींनी लाचखोरीच्या प्रकरणानंतर कोठे व किती पैसै द्यावे लागतात, याची यादीचं बाहेर काढल्याचे कळते. या प्रकरणात अजून काही बडे मासे एसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.