Nashik Ravindra Erande case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिकचा दुसरा खरात 'रविंद्र एरंडे'ची फाईल ओपन, अश्लील व्हिडीओ पॉर्न साईटला विकल्याचा संशय..

Nashik Ravindra Erande case : रविंद्र एरंडेच्या टॅब व हार्डडिस्कमध्ये महिलांचे १२१ आक्षेपार्ह व्हिडीओ मिळाले आहेत. खरातप्रकरण ताजे असतानाच या नव्या प्रकरणाने नाशिक हादरले आहे.

Ganesh Sonawane

Nashik Ravindra Erande : नाशिकमध्ये एका ऑफिस बॉयने आपल्या मालकाच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे. भोंदू अशोक खरातप्रमाणेच आता तथाकथित पत्रकार व लघुउद्योग कन्सल्टंट म्हणवणाऱ्या ६३ वर्षीय रवींद्र गणपत एरंडे याची फाईल ओपन झाली आहे.

रवींद्र गणपत एरंडे याने पोलिस ठाण्यात आपला ऑफिसबॉय व त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दिली होती. आपल्याला ब्लॅकमेल करून बारा लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार त्याने केली होती. एरंडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ऑफिसबॉयसह चार खंडणीखोरांना अटक केली.

मात्र, खंडणीखोरांकडून जप्त केलेल्या 'डीव्हीडी'मध्ये या रवींद्र गणपत एरंडे याचेच शंभरहुन अधिक आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तथाकथित पत्रकार व व्यावसायिक रवींद्र एरंडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सातपूर पोलिसांनी संशयित एरंडे याला बलात्कारासह ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या महिलांचे लैंगिक शोषण व फसवणूक प्रकरणातील अनेक बाबी दिवसेंदिवस उघड होत असताना, नाशिकमध्ये आणखी एक हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या प्रकरणाला खरात पार्ट २ संबोधले जात आहे. तर संतप्त भावनेतून रविंद्र एरंडेला दुसरा अशोक खरात संबोधलं जात आहे. कारण एरंडे याच्याही काही प्रकरणांत खरातप्रमाणे साम्य दुवे आहेत. खरातप्रमाणेच एरंडे हा देखील ज्योतिष पाहत होता असे सांगितले जात आहे.

पोलिसांच्या हाती लागलेल्या टॅब, हार्डडिस्कमध्ये रविंद्र एरंडे याचे महिलांसोबत तब्बल १२१ अश्लील व्हिडीओ आहेत. महिलांना वेगवेगळे आमिष दाखवून एरंडेने त्यांच्यावर अत्याचार केल्याचे व व्हिडीओ काढल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. एरंडेच्या ऑफिसबॉयने हार्डडिस्क व टॅब चोरुन मित्रांच्या मदतीने एरंडेला ब्लॅकमेल केले. त्याविरोधात एरंडे याने पोलिसांत तक्रार दिली. मात्र आता तोच या जाळ्यात अडकला आहे. या गुन्ह्यातील चार खंडणीखोर व रविंद्र एरंडे हे सगळे आता पोलिस कोठडीत आहे.

दरम्यान यातील काही आक्षेपार्ह व्हिडीओ रविंद्र एरंडे याने पॉर्न साईटला विकल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिस याबाबत शोध घेत आहे. रवींद्र एरंडे हा पत्रकार, लघुउद्योग कन्सल्टंट ते थेट अश्लील व्हिडीओकांडातील संशयित आरोपी बनला आहे. त्याने महिलांना नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. (Nashik Crime)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT