Sandeep Karnik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Police action in Nashik : शहरात बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यांना संदीप कर्णिकांचा दणका!

Sampat Devgire

Nashik Crime & Politics : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे नुकतेच शहरात रुजू झाले असून, त्यांनी भाईगिरी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी बेकायदा होर्डिंग लावून भाईगिरी करणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी त्यांनी 122 होर्डिंग काढून टाकले. त्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात ९९ गुन्हे दाखल झाले आहेत.

राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते नेते (Nashik) अनधिकृत होर्डिंग लावण्यात आघाडीवर असतात. (NMC) त्यांच्यात पावलावर पाऊल ठेऊन विविध नेत्यांचे पाठीराखे, गुंडगिरी करणारे देखील सध्या वाढदिवसाचे फलक लाऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी (Police) याबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

कारवाईचा धडाका पोलिसांनी लावला आहे. तरीही शहराच्या विविध भागात गुन्हेगारी नियंत्रणात येताना दिसत नाही. उपनगरांमध्ये दहशत माजविण्यासाठी अल्पवयीन मुले, सराईत गुन्हेगारांकडून वाहने जाळण्याचे प्रकार सर्रास घडत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहे. हे प्रकार केवळ परिसरात दहशत निर्माण करीत भाईगिरी करण्यासाठी होत आहे. त्यावर अत्यंत कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

याच पार्श्वभूमीवर नुकतेच शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक चौकात वाढदिवसाचे होर्डिंग लावले होते. त्यावर काही समर्थकांचे देखील फोटो होते. त्याबाबत सरकारवाडा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचा प्रकार केल्याने गुन्हा दाखल केला.

यापुढे नियमीतपणे पोलिस अशी कारवाई करणार आहेत. आडगाव ४, इंदिरानगर ४७, उपनगर ७, भद्रकाली१०, पंचवटी ७, मुंबई नाका ४, सरकारवाडा १२, गंगापूर ८ असे ९९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे दाखल करणे सुरू -

‘शहराच्या अनेक भागात सराईत गुन्हेगार तसेच त्यांचे पाठीराखे अनधिकृत होर्डिंग लावतात. चमकोगिरी करून चर्चेत येण्यासाठी हे प्रकार होतात. मात्र त्याचा नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे शहरात होर्डिंग लावून गुंडगिरी, भाईगिरी करणाऱ्यांविरोधात कठोर पावले टाकली जात आहेत. गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. असे प्रकार आढळल्यास नागरिकांनी देखील त्याची माहिती द्यावी. असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT