Ravindra Erande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिकमध्ये खरात पार्ट 2, ऑफिसबॉयनेच मालकाला अडकवलं, 121 महिलांचे अश्लील व्हिडिओ..

Nashik Ravindra Erande sexual exploitation : नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरणही महिलांच्या लैंगिक शोषणाच्या संबधीत असून शेकडो व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे प्रकरण संपूर्ण देशभर चर्चेत आहे. भोंदू अशोक खरातने शेकडो महिलांचे लैगिंक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक करत त्याने मोठी माया जमवली आहे. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच नाशिकमध्ये अशाच प्रकारे महिलांच्या लैगिंक शोषणासंबंधी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरात पार्ट 2 अशी चर्चा नाशिकमध्ये या प्रकरणाविषयी सुरु आहे.

शहराच्या सातपूर परिसरात घडलेल्या या प्रकरणाने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. स्वत:ला पत्रकार व लघुउद्योजक कन्सल्टंट म्हणवणाऱ्या ६३ वर्षीय व्यक्तीने आपल्याकडे १२ लाखांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण, त्यातून तक्रारदाराचेच महिलांच्या अत्याचाराचे शेकडो व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणात तक्रारदाराच्या कार्यालयातून चोरुन नेलेल्या टॅबमधील अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १२ लाख रुपयांची खंडणी मागणी चौघांनी केली होती. अटक केलेल्या चौघांच्या टोळीमधील एक संशयित हा तक्रारदाराकडे 'ऑफिसबॉय' होता. त्याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा झाला असून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

याप्रकरणात पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, स्वयंघोषित पत्रकार असलेला तक्रारदार रवींद्र गणपत एरंडे हा २००३ पासून अनेक महिलांना उद्योग उभारणीचे आमिष दाखवून त्याने आपल्या केबिनमध्ये बोलावले. त्यांच्या अडचणींचा फायदा घेत अत्याचार केले. या अत्याचाराचे त्याने छुप्या रीतीने रेकॉर्डिंग केले. हे सर्व व्हिडिओ त्याने टॅब आणि हार्डडिस्कमध्ये साठवून ठेवले होते

दरम्यान त्याच्याकडे ऑफिसबॉय म्हणून काय करणाऱ्या आकाश बकरे याने टॅब व हार्डडिस्क चोरली. त्यात १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ पाहून त्याने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने तक्रारदार रवींद्र गणपत एरंडे याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी १२ लाख रुपयांची मागणी केली. सुरुवातीला एरंडे यांनी त्यांना १० हजार रुपये दिले. परंतु ब्लॅकमेल करणाऱ्या चौघांची मागणी वाढत गेल्याने त्याने सातपूर पोलिस ठाण्यात धाव घेत चोरी व खंडणीची तक्रार दाखल केली.

मात्र, तपासात पोलिसांच्या हाती व्हिडिओ लागताच त्यांनाही धक्का बसला. कारण माझ्याकडून १२ लाखांची खंडणी मागितल्याची फिर्याद एरंडेनेच दिली होती. मात्र, तोच आरोपीच्या पिंजऱ्यात गेला आहे. पोलिसांनी संशयित एरंडे यालाही अटक केली आहे. त्याच्याविरोधातच अत्याचारासह गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Nashik News)

ज्या व्हिडिओवरून ऑफिसबॉयसह चौघे संशयित हे फिर्यादी एरंडे याला ब्लॅकमेल करीत होते, ते हार्डडिस्क, २ पेनड्राइव्ह व मोबाईल संशयितांकडून पोलिसांनी जप्त केले आहे. त्याची तपासणी करताना पोलिसही चक्रावले. कारण त्यात, २००३ ते २०२४ दरम्यान १२१ हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ आढळून आले. ऑफिसमध्ये लावलेल्या कॅमेऱ्याद्वारे हे रेकॉर्डिंग केल्याचे दिसून येत आहे. ज्या महिला शोषणाला बळी पडल्या आहेत, त्यांनी न घाबरता पुढे यावे. पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT